नागपुरात उद्योजकांना कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:38 IST2019-01-02T23:36:55+5:302019-01-02T23:38:51+5:30
सुक्ष्म, लघु आणि मध्यम समूहातील अन्न प्रक्रिया उद्योगांना पंतप्रधान शंभर दिवस उपक्रमांतर्गत स्टेट बँकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतगृह सभागृहात बुधवारी उद्यमी ऋण जागरूकता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ‘एमएसएमई ५९ मिनिटांत कर्ज’ या योजनेंतर्गत २५ उद्योजकांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.

नागपुरात उद्योजकांना कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुक्ष्म, लघु आणि मध्यम समूहातील अन्न प्रक्रिया उद्योगांना पंतप्रधान शंभर दिवस उपक्रमांतर्गत स्टेट बँकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतगृह सभागृहात बुधवारी उद्यमी ऋण जागरूकता अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते ‘एमएसएमई ५९ मिनिटांत कर्ज’ या योजनेंतर्गत २५ उद्योजकांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले.
स्टेट बँकेतर्फे मुद्रा प्रधानमंत्री उद्योजकता आणि इतर विविध योजनेंतर्गत २५ उद्योजकांना सहा कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. एमएसएमई यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने कर्ज वितरित करण्यात आले. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, एमएसएमईचे सहायक संचालक किशोर काळकर, बँकेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार, सचिन फडणवीस, अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे, मनोज तिवारी, डिक्कीचे निश्चय शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सुरेश विंचूरकर, विजय अगस्ती, जीएसटीचे अधीक्षक सुरेश रायलू, ईएसआयसीचे शाखा व्यवस्थापक शिरीष मुठाळ उपस्थित होते.
उद्योजकाने कर्ज कसे घ्यावे, याबाबत असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेची माहिती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती उद्योजकांना देण्यात आली. तसेच यावेळी उद्योजकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. एमएसएमईअंतर्गत २ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू झालेले योजनेंतर्गत विविध बँकांद्वारे नागपूर जिल्ह्यात उद्योजकांसाठी मेळावे शंभर दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विविध बँकांचे अधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.