शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘मन की बात’ ऐकण्यासाठी नाश्त्याची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 10:43 IST

‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागरिकांना एकत्र आणा, असे आदेश पक्षातर्फे नगरसेवकांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निरोप देऊनही लोक एकत्र येत नसल्याचे दिसून आल्यावर काही नगरसेवकांनी स्वखर्चाने चहा नाश्त्याची सोय केली.

ठळक मुद्देगर्दी जमविण्याची भाजपाची शक्कल प्रतिसाद थंडावल्याची चिंता

आॅनलाईन लोकमतनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ मांडून देशाला संदेश द्यायचे. सुरुवातीला या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद मिळाला. लोक गर्दी करून हा कार्यक्रम ऐकू लागले. मात्र, गेल्या काही महिन्यात याला मिळणारा प्रतिसाद थंडावल्याचे चित्र आहे. हे चित्र पालटून मोदींना ऐकण्यासाठी गर्दी जमविण्याकरिता भाजपाने नवी शक्कल काढली आहे. ‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागरिकांना एकत्र आणा, असे आदेश पक्षातर्फे नगरसेवकांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निरोप देऊनही लोक एकत्र येत नसल्याचे दिसून आल्यावर काही नगरसेवकांनी स्वखर्चाने चहा नाश्त्याची सोय केली. नाश्ता आल्यानंतर मात्र गर्दी काहीशी टिकून राहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्यातून एकदा रविवारी सकाळी १० वाजता आकाशवणीवरून ‘मन की बात’ मध्ये देशाची संवाद साधतात. सुरुवातीला हा कार्यक्रम खूप गाजला. पंतप्रधान यावेळी काय बोलतील याची नागरिकांना उत्सुकता असायची. देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींची उदाहरणेही यातून दिली जायची. मोदींनी व्यक्त केलेल्या मतांवर पुढील काही दिवस सामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळात खलबते व्हायची. मोदींचे व पर्यांयाने भाजपाची विकासाभिमुख इमेज तयार करण्यात या कार्यक्रमाचा मोठा वाटा आहे.मात्र, कालांतराने विरोधकांनी ‘मन की बात’ ला लक्ष्य करीत ‘काम की बात’ करो, असे टोले लगावण्यास सुरुवात केली. हा मुद्दा विरोधकांनी जनतेसमोरही लावून धरला. विरोधकांकडून नागरिकांमध्ये ‘मन की बात’ची थट्टा केली जाऊ लागली. या सर्व कारणांमुळे या कार्यक्रमाला नागरिकांकडून मिळणारा प्रतिसादही काहिसा कमी होत गेला. लोकप्रियतेप्रति नेहमी सतर्क असणाऱ्या भाजपाची यामुळे चिंता वाढली आहे.एकत्र येण्याचे पदाधिकाऱ्यांना मॅसेजभाजपाने प्रभागनिहाय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांचे निरोप एका मिनिटात देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता ‘मन की बात’ साठी गर्दी जमविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थित रहावे, असे मेसेज या ग्रूपच्या माध्यमातून दिले जात आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी