नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या आदेशानुसार विदर्भातील जिल्हा पालक न्यायमूर्तीची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यरत न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या कामगिरीचा आढावा घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, न्यायालयांतील सोयीसुविधांचे निरीक्षण करणे, वकील संघटनांच्या तक्रारी स्वीकारणे, वकिलांचे व्यवस्थेविषयी असलेले वैयक्तिक प्रश्न समजून घेणे, यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तीना अहवाल सादर करणे इत्यादी जबाबदाऱ्या पालक न्यायमूर्तीना सांभाळाव्या लागतात.
असे आहेत जिल्हा पालक न्यायमूर्तीनागपूर - न्या. अनिल किलोर व न्या. प्रफुल्ल खुबाळकर.अमरावती - न्या. अनिल किलोर व न्या. प्रवीण पाटील.यवतमाळ - न्या. मुकुलिका जवळकर व न्या. वृषाली जोशी.चंद्रपूर - न्या. अनिल पानसरे व न्या. महेंद्र नेरलीकर.गडचिरोली - न्या. अनिल पानसरे.अकोला - न्या. उर्मिला जोशी-फलके.भंडारा - नया. महेंद्र चांदवाणी.गोंदिया - न्या. महेंद्र चांदवाणी.वर्धा - न्या. वृषाली जोशी.वाशिम - न्या. अभय मंत्री व न्या. महेंद्र नेरलीकर.बुलढाणा - न्या. अभय मंत्री व न्या. महेंद्र नेरलीकर.