शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरून असंतोष वाढवणाऱ्यांची यादी; इंटेलिजन्सची माहिती, योग्य वेळी जाहीर करू : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 05:47 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांची मोठी माहिती.

नागपूर : महाराष्ट्राच्या विविध सीमा भागांमध्ये इतर राज्यांमध्ये जाण्याची जी मानसिकता बोलून दाखवली जात आहे, त्यामागे कोणत्या राजकीय पक्षाचे लोक आहेत याची सगळी माहिती इंटेलिजन्सच्या माध्यमातून आमच्याकडे आली आहे. योग्य वेळी ती जाहीर करू, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते म्हणाले, सीमेवरील महाराष्ट्रातील गावांमध्ये जायचे, लोकांच्या बैठकी घेऊन त्यांना चिथावणी द्यायची व इतर राज्यांत आम्ही जाणार, असे बोलायला लावायचे, हे प्रकार घडले आहेत. ते करण्यामागे कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते याची माहिती आमच्याकडे आलेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. योग्यवेळी ती माहिती सभागृहातदेखील मांडू. काही नेते जाणीवपूर्वक महाराष्ट्रात ही भावना पेटवत आहेत. तिकडे इतर राज्यांत सगळे पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी सीमावादाचा प्रश्न उचलतात आणि इथे मात्र अतिशय हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे. आपण दुसऱ्या राज्यात जाऊ, त्या-त्या दृष्टीने ठरावदेखील मंजूर करू, अशी चिथावणी देत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कदाचित ते लक्षात आले नसेल. चिथावणी देणाऱ्यांची नावे आम्ही त्यांच्याकडे पाठवू, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला. 

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

  • केवळ विरोधासाठी विरोध ही महाविकास आघाडीची भूमिका नाही. राज्यातील खरे प्रश्न व विधेयकांवर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार असल्याची भूमिका विरोधी पक्षांतर्फे मांडण्यात आली. 
  • परंतु, महापुरुषांचा सातत्याने होणारा अपमान, सीमाप्रश्न हाताळण्यात आलेले अपयश व विदर्भाच्या अनुशेषाबाबतची उदासीनता या मुद्द्यांवर विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. 

यापूर्वी केंद्रामध्ये कोणाची सरकारे होती, हे सर्वांना माहिती आहे. अडीच वर्षांत सीमावासीयांच्या सुविधा, मुख्यमंत्री धर्मादाय निधीमधून दिले जाणारे लाभ, महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील लाभ बंद केले होते. आम्ही ते सुरू केले. बंद पडलेल्या योजनांचा लाभ दिला. सीमा प्रश्न ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यात कोणीही राजकारण करू नये.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

सर्व मंत्रिमंडळही आता लोकायुक्तांच्या कक्षेतराज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातच राज्याच्या नवीन लोकायुक्त कायद्याचे विधेयक आणले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्र परिषदेत केली. या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री, राज्याचे सर्व मंत्रीदेखील येतील, असेही त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर