भोजनालयात दारू पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:50+5:302021-05-25T04:09:50+5:30
तेवीस आरोपी सापडले : गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी भोजनालये बंद ठेवण्याचे आदेश ...

भोजनालयात दारू पार्टी
तेवीस आरोपी सापडले : गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी भोजनालये बंद ठेवण्याचे आदेश असताना पाचपावलीतील एका भोजनालयात रविवारी रात्री दारू पार्टी सुरू होती. पोलिसांनी तेथे छापा घालून २३ जणांना ताब्यात घेतले.
साई केजीएन फ्राय कॉर्नर पाचपावली नामक भोजनालयात मोठी गर्दी असून, आतमध्ये चिकन, मटण, दारू मिळत असल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला कळले. त्यावरून पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी भोजनालयाचा मालक आरोपी चंदू अशोक निनावे हा आतमध्ये ग्रहकांना चिकन, मटण तसेच दारू, बिअर पुरवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तेथे शुभम गौर, रोहित झलोने, सचिन पारडे, अतुल गायकवाड, मुकेश कुंभारे, रवी मसराम, शैलेश पालकर, विशाल गोखले, प्रफुल्ल आंबेकर, साजेश जळगावकर, सुभाष बोकडे, सुरज भवरे, अभिषेक धकाते, राहुल मलंगे, सुरज साखरकर, रोहित ढाळे, हेमंत ठाकूर, विकी गोखले, नामदेव वाकोडीकर, रवी भानारकर, अजय पठारे, आकाश निमजे आणि शुभांगण घंगारे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
---