शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जवसापासून तयार होणार लिनेन; नागपूर जिल्ह्यात प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:39 IST

नागपुरात जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग पुढे यशस्वी ठरल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर ‘फायबर’ निर्मिती सुरूसुरतचे उद्योजक पाहणासाठी येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगातील अनेक देशात जवसाच्या कांड्यांपासून लिनेन कापडाची निर्मिती केली जाते. भारतातही हे प्रकल्प आहेत. मात्र, यासाठी ‘रॉ मटेरियल’ म्हणून लागणाऱ्या जवसाच्या कांड्यांची विदेशातून आयात करावी लागते. आता मात्र नागपुरातही जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग पुढे यशस्वी ठरल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.विदर्भ माझा पक्षाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कळमेश्वर तालुक्यातील उपरवाही येथे अंबिका चांडक यांनी जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे. सुरत येथील वस्त्रोद्योग उद्योजकांशी चर्चा झाली आहे. ते लवकरच हा प्रायोगिक प्रकल्प पाहण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील चिखलापार, ता़ भिवापूर येथील प्रगतिशील शेतकरी डॉ़ नारायण लांबट हे नामशेष होत चाललेल्या जवस बियांचे संगोपन, मशागत व जवसाच्या उत्पादनांसाठी प्रयत्न करीत आहेत़ जवसापासून धागा निर्माण करण्याचे तंत्रज्ञानही आता विकसित केले जात आहे. १९६० सालापर्यंत विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे जवस बियांपासून तयार केलेल्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. हे तेल सेवन केल्यानंतर शरीरातील कोलेस्ट्रॉलच नाहिसे होतात. तसेच हे तेल आरोग्यासाठी लाभदायक आहे. परंतु, नंतर जवस तेलाची जागा शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तांदळापासून तयार होणाऱ्या तेलाने घेतली. विदर्भात सोयाबीन तेलाची निर्मिती होऊ लागल्याने जवस तेल दुर्लक्षित झाले.जवसाला पर्याय म्हणून इंग्रजांनी कापूस आणला. कापसापासून कापड तयार होऊ लागला. त्यामुळे जवसापासून तयार होणारे लिनेन मागे पडले. विदर्भात जवस उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. जवसापासून तेल, जनावरांसाठी खाद्य ढेप आणि दांड्यापासून लिनेन तयार होऊ शकतो. जवसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्यास त्यांची आर्थिक स्थिती सुधारु शकते, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला युगांतर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. वामनराव कोंबाडे, बाबा कोंबाडे, नाना ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती