जवसापासून तयार होणार लिनेन; नागपूर जिल्ह्यात प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:39 IST2018-03-10T10:39:38+5:302018-03-10T10:39:48+5:30
नागपुरात जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग पुढे यशस्वी ठरल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

जवसापासून तयार होणार लिनेन; नागपूर जिल्ह्यात प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगातील अनेक देशात जवसाच्या कांड्यांपासून लिनेन कापडाची निर्मिती केली जाते. भारतातही हे प्रकल्प आहेत. मात्र, यासाठी ‘रॉ मटेरियल’ म्हणून लागणाऱ्या जवसाच्या कांड्यांची विदेशातून आयात करावी लागते. आता मात्र नागपुरातही जवसाच्या काड्यांपासून फायबर निर्मिती करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. हा प्रयोग पुढे यशस्वी ठरल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
विदर्भ माझा पक्षाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
जवसाला पर्याय म्हणून इंग्रजांनी कापूस आणला. कापसापासून कापड तयार होऊ लागला. त्यामुळे जवसापासून तयार होणारे लिनेन मागे पडले. विदर्भात जवस उत्पादनासाठी पोषक वातावरण आहे. जवसापासून तेल, जनावरांसाठी खाद्य ढेप आणि दांड्यापासून लिनेन तयार होऊ शकतो. जवसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्यास त्यांची आर्थिक स्थिती सुधारु शकते, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला युगांतर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. वामनराव कोंबाडे, बाबा कोंबाडे, नाना ठाकरे उपस्थित होते.