वाहनाच्या डिक्कीतील राेख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:25+5:302021-02-06T04:13:25+5:30
कळमेश्वर : दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ६ हजार रुपये चाेरट्याने लंपास केले. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी भागात बुधवारी (दि. ...

वाहनाच्या डिक्कीतील राेख लंपास
कळमेश्वर : दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ६ हजार रुपये चाेरट्याने लंपास केले. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी भागात बुधवारी (दि. ३) दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली.
मधुकर नारायण भोंगाडे, रा. गुमथळा हे कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी फाटा परिसरात वासुदेव इखार यांच्याकडे किरायाने राहतात. सहा हजार रुपयांचे सुटे घेण्यासाठी ते शहरातील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले हाेते. बॅंक कर्मचाऱ्यांचा भाेजन अवकाश असल्याने त्यांनी ही रक्कम पिशवीत व ती पिशवी एमएच-३१/सीटी-३६६० क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. बॅंकेत वेळ असल्याने ते याच दुचाकीने घरी परत आले. त्याचवेळी एक २० ते २२ वर्षे वयाेगटातील तरुणाने त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. मधुकर भाेंगाडे घरात जाताच त्या चाेरट्याने विविध चाव्यांचा वापर करीत दुचाकी उघडण्याचा प्रयत्न केला. ती न उघडल्याने त्याने दुसऱ्या बाजूने डिक्कीत हात टाकून रकमेची पिशवी काढून घेत पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच मधुकार भाेंगाडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. शहरातील वाढत्या चाेरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.