राेख ५० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:38+5:302021-03-31T04:09:38+5:30

देवलापार : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख ५० हजार रुपये चाेरून नेले. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील छवारी ...

Line 50 thousand lamps | राेख ५० हजार लंपास

राेख ५० हजार लंपास

देवलापार : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख ५० हजार रुपये चाेरून नेले. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील छवारी येथे शनिवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास घडली.

माेनाबाई रामचरण भलावी (४८, रा. छवारी, ता. रामटेक) या मुलीची प्रकृती खराब असल्याने तिच्या औषधाेपचाराकरिता त्या खवासा, मध्य प्रदेश येथे गेल्या हाेत्या. दरम्यान, त्यांच्या घरी कुणीही नसताना अज्ञात चाेरट्याने घराच्या मागील दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरामधील देवघरात ठेवलेली सुटकेस उघडून तेथील लहान पर्समधील राेख ५० हजार रुपये चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच भलावी यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार अशाेक उईके करीत आहेत.

Web Title: Line 50 thousand lamps