कृषी केंद्रातून राेख २५ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:31+5:302021-02-23T04:13:31+5:30

जलालखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत कृषी सेवा केंद्रातून राेख २५ हजार ५०० रुपये चाेरून नेले. ही घटना जलालखेडा ...

Line 25,000 lamps from agriculture center | कृषी केंद्रातून राेख २५ हजार लंपास

कृषी केंद्रातून राेख २५ हजार लंपास

जलालखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत कृषी सेवा केंद्रातून राेख २५ हजार ५०० रुपये चाेरून नेले. ही घटना जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा (घुडन) येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

चरण बापूराव देवासे रा. खापा (घुडन), ता. नरखेड यांचे गावात मयूर ॲग्राे एजन्सी नावाने कृषी सेवा केंद्र असून, शनिवारी त्यांनी उधारीचे राेख २५ हजार रुपये कृषी केंद्रातील गल्ल्यात ठेवले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने दुकानाच्या गल्यातील एकूण २५,५०० रुपये राेख घेऊन पाेबारा केला. रविवारी सकाळच्या सुमारास देवासे हे शेतात जायला निघाले असता, त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले आढळले. दुकानात चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, गुन्ह्याचा तपास पाेलीस अंमलदार देवीदास सातंगे करीत आहेत.

Web Title: Line 25,000 lamps from agriculture center