शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील लिफ्ट अपघातग्रस्तांना यापुढे मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:31 IST

महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग विधेयक २०१७ गुरुवारी विधानसभेने एकमताने मंजूर केले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विधेयक सादर केले.

ठळक मुद्देउद्वाहने, सरकते जिने विधेयक विधानसभेत मंजूर

आॅनलाईन लोकमतनागपूर : इमारतींमध्ये लिफ्टचा वापर वाढला आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणीही सरकत्या जिन्यांचा वापर होऊ लागला आहे. याचा वापर करताना नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून लिफ्ट किंवा सरकत्या जिन्यांवर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना आता आर्थिक मदत मिळणार आहे.महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग विधेयक २०१७ गुरुवारी विधानसभेने एकमताने मंजूर केले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विधेयक सादर केले. विधेयकाबाबत सांगताना बावनकुळे म्हणाले, या विधेयकात उद्वाहनाचा वापर करताना अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत मिळावी म्हणून त्रिपक्ष विमा संरक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. उद्वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याची तरतूद, उद्वाहन उभारणी व देखभाल करण्यासाठी ठेकेदारास, कंपनीस किंवा उत्पादकास अनुज्ञप्ती देण्याची तरतूद, असुरक्षितपणे वापर केल्यास अथवा नियमांचे उल्लंघन केल्यास सील करण्याचे अधिकार, आदी तरतुदी नवीन विधेयकात करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र उद्वाहने अधिनियम १९३९ मध्ये आजपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नव्हती. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात शासनातर्फे सदर अधिनियम सुधारित करण्याबाबत शपथपत्र दाखल करण्यात आले होते. सध्या उद्वाहन क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक प्रकारचे उद्वाहन सरकते जिने यांचा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी वापर होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकते जिने व सरकते मार्ग यांचे निरीक्षण करण्याची तरतूद करण्यात आली नव्हती. विधेयकाच्या नवीन मसुद्यात सरकते जिने व सरकते मार्ग यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. सरकत्या जिन्यांचे व मार्गांचे निरीक्षणामुळे वापर करताना अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७