शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील मेयो रुग्णालयातल्या रुग्णांना जीवाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:49 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) काही इमारतीने शंभरी गाठली आहे. बांधकाम विभागाच्या सूचनेवरून व्हीएनआयटीने यातील काही इमारतींचे सर्वेक्षण करून इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे.

ठळक मुद्देधोक्याचा इशारा देऊनही इमारतीचा रुग्णसेवेत वापरव्हीएनआयटीने घोषित केल्या धोकादायक इमारतीअपघात झाल्यास जबाबदार कोण?

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) काही इमारतीने शंभरी गाठली आहे. बांधकाम विभागाच्या सूचनेवरून व्हीएनआयटीने यातील काही इमारतींचे सर्वेक्षण करून वॉर्ड क्र. ३, ४, ७ व ८ असलेल्या वॉर्डाच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. मात्र, त्यानंतरही या इमारतीतून रुग्णसेवा दिली जात आहे. धक्कादायक म्हणजे, वॉर्ड ३ आणि ७ बालरोग रुग्णांचा आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात मेडिकल त्वचारोग विभागाच्या इमारतीचा अचानक सज्जा कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला मेयोच्या धोकादायक इमारतीशी जोडून पाहिले जात आहे.ब्रिटिशांनी ‘सिटी हॉस्पिटल’ या नावाने १८६२ मध्ये या हॉस्पिटलची स्थापना केली; नंतर महानगरपालिकेने धर्मादाय दवाखाना म्हणून चालवायला घेतले. १९६७ सालापासून राज्य सरकारकडे मेयोचे नियंत्रण आले. ३८.२६ एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयात आजही पाचवर इमारतीचे वय शंभरी पुढे गेले आहे. यात १८८१ मध्ये बांधलेले आकस्मिक विभाग आजही रुग्णसेवेत कायम आहे. मागील वर्षी बांधकाम विभागाने रुग्णालयाच्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ हाती घेतले. यात ‘व्हीएनआयटी’ची मदत घेतली. अडीच महिन्यापूर्वीच त्याचा अहवाल प्राप्त झाला. यात ब्रिटिशकालीन इमारतीत असलेले वॉर्ड क्र. ३, ४, ७ व ८ धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद केले. परंतु आजही या वॉर्डातून रुग्णसेवा सुरू आहे.मेडिसीनच्या पडक्या इमारतीत वॉर्ड क्र.३ व ४‘व्हीएनआयटी’ने वॉर्ड क्र. ३ व ४ असलेल्या ब्रिटिशकालीन इमारतीलाही धोकादायक घोषित केले आहे. हे दोन्ही वॉर्ड औषधवैद्यकशास्त्र विभागाचे (मेडिसीन) आहेत. या दोन्ही वॉर्डात खाटांच्या संख्येच्यावर रुग्ण भरती आहेत. याच इमारतीला जोडून वॉर्ड क्र. ५, ६ व २४ ची इमारत आहे. हा मेडिसीन विभागाचा महिलांचा वॉर्ड आहे. ब्रिटिशकालीन इमारतीला धोका झाल्यास जोडून असलेल्या या इमारतीलाही धोका होण्याची शक्यता आहे.नव्या इमारतीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्षचमेयोने नव्या इमारतीसाठी गेल्या वर्षीच प्रस्ताव पाठविला. तीन लाख स्क्वेअर फूट जागेवरील या इमारतीत मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अपघात विभाग, एमआयसीयू, पीआयसीयू, आयसीयू, चार शस्त्रक्रियागृह, लेबर रुम, रेडिओलॉजी विभाग प्रस्तावित आहे. तळमजल्यासह सहा मजल्याच्या या इमारतीच्या बांधकामासाठी बांधकाम विभागाने २६५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने हा खर्च खूप जास्त असल्याचे सांगून, कमी खर्चाचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार एप्रिल २०१९ मध्ये एक मजला कमी करून सुमारे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडून वित्त व नियोजन विभागाकडे पडून आहे.बालरोग विभागाच्या वॉर्डाची इमारत धोक्यात‘व्हीएनआयटी’च्या अहवालात ब्रिटिशकालीन इमारतीतील बालरोग विभागाचा वॉर्ड क्र. ७ व ८ हा धोकादायक स्थितीत असल्याचे म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी वॉर्ड क्र. ८ला गळती लागल्याने तो बंद करण्यात आला. परंतु वॉर्ड क्र. ७ अद्यापही सुरू आहे. महिनाभरापूर्वीच या वॉर्डाच्या स्लॅबचा काही भाग खाली पडला होता.

‘व्हीएनआयटी’ने वॉर्ड क्र ३, ४, ७ व ८ ची इमारत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल दिला आहे. हे वॉर्ड इतर ठिकाणी स्थानांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही वॉर्ड स्थानांतरित करण्यात आले आहेत. नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.-डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, मेयो

टॅग्स :Healthआरोग्य