शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सासऱ्याच्या खुनात जावयाला जन्मठेप

By admin | Updated: August 13, 2016 02:00 IST

उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा येथे कुऱ्हाडीने घाव घालून सासऱ्याचा खून आणि सासूला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी जावयास

पत्नीला नेण्यास केला होता विरोध : उदासा येथील थरार नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदासा येथे कुऱ्हाडीने घाव घालून सासऱ्याचा खून आणि सासूला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी जावयास अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप खोचे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अशोक किसन कन्नाके (४०), असे आरोपीचे नाव असून तो उमरेड भागातीलच गोधनी येथील रहिवासी आहे. मधुकर बुधाजी गेडाम (७०) रा. उदासा, असे मृताचे नाव होते. सासू चंद्रभागा मधुकर गेडाम (६०) आणि पत्नी पुष्पा अशोक कन्नाके (३५), असे घटनेच्या वेळी जखमी झालेल्यांची नावे होती. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अशोक कन्नाके हा कोणताही कामधंदा न करता पत्नी पुष्पाचे रोजमजुरीचे पैसे हिसकावून दारू प्यायचा आणि घरून बराच काळ बेपत्ता राहायचा. पैसे संपले की पुन्हा घरी यायचा. पत्नीने पैसे दिले नाही की, मारहाण करायचा. त्याच्या त्रासाने पुष्पा २६ जानेवारी २०१५ रोजी आपल्या उदासा येथील माहेरी गेली होती. तिच्या मागेच अशोक कन्नाके हा उदासा येथे गेला होता. त्याने पुष्पाला सोबत चल म्हणताच तिने येण्यास नकार दिला होता. या शिवाय सासरे मधुकर गेडाम आणि सासू चंद्रभागा यांनीही त्याला पुष्पाला नेण्यास मज्जाव केला होता. पंचकमिटी बसवतो, असे ते त्याला म्हणाले होते. त्यामुळे तो रागाने निघून गेला होता. ३० जानेवारी २०१५ च्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मधुकर आणि त्यांची पत्नी चंद्रभागा हे एकाच खाटेवर झोपलेले असताना अशोक हा दाराला धक्का देऊन आत शिरला होता. त्याने झोपलेल्या सासू-सासऱ्यावर कुऱ्हाडीने घाव घालणे सुरू केले होते. आवाजाने पुष्पा झोपेतून उठातच तिला हे भयावह दृश्य दिसले होते. ती आई-वडिलाच्या बचावासाठी धावताच अशोकने तिच्यावरही वार केला होता. तिचे डोके फुटले होते. जखमींना उपचारार्थ शासकीय इस्पितळात नेण्यात आले असता मधुकर गेडाम यांचा मृत्यू झाला होता. उमरेडचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नितीन वडते यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा सुनावली. आरोपीची पत्नी पुष्पा आणि दोन मुलांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याची शिफारस न्यायालयाने विधी सेवा प्राधिकरणाला केली आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील एम. जी. पौळ यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एम. म्हात्रे , हेड कॉन्स्टेबल अरुण नेवारे आणि अशोक काळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)