शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याची हत्या करणाऱ्या पोलिसाची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: January 14, 2024 18:53 IST

गडचिरोली जिल्ह्यातील घटना

राकेश घानोडे/नागपूर : वारंवार घरी येण्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर सासऱ्याला बंदुकीची गोळी झाडून ठार मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आहे.

मनोज रामू गावडे (३९) असे आरोपीचे नाव असून घटनेच्या वेळी तो अहेरी येथे राहत होता. मृताचे नाव मारुती वारलू मट्टामी होते. गावडेला दारूचे व्यसन होते. तो पत्नी नीलिमासोबत नेहमी भांडण करीत होता. मट्टामीला नीलिमाची चिंता वाटत होती. त्यामुळे ते वेळोवेळी नीलिमाला भेटण्यासाठी जात होते. २३ जून २०२१ रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपी कर्तव्यावरून घरी आला. त्यावेळी मट्टामीला घरी पाहून आरोपी चिडला. त्याने मट्टामीसोबत भांडण केले.

दोघेही लवकरच हातापाईवर आले. दरम्यान, आरोपीने बंदुक काढून मट्टामीवर गोळी झाडली. परिणामी, मट्टामी जाग्यावरच ठार झाले. त्यानंतर आरोपीने नीलिमावरही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. बंदूक हिसकावण्यात यशस्वी ठरल्यामुळे ती बचावली. २४ मार्च २०२३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता त्याचे अपील फेटाळून लावले. सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.

नीलिमाने सरकारला सहकार्य केले नाहीपतीला शिक्षा होण्याची शक्यता लक्षात घेता नीलिमाने खटल्याच्या वेळी सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. तसेच, बंदुकीतील गोळी मट्टामी यांना कशी लागली, याचे स्पष्टीकरण आरोपीने दिले नाही. असे असले तरी, परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय