शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव क्रेनने घेतला अभियंत्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:03 IST

मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देसुभाषनगरात अपघात : आरोपी क्रेनचालक गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.मेकॅनिकल इंजिनिअर असलेले हंसराज वानखेडे हिंगणा एमआयडीसीत एका खासगी कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते त्यांच्या एमएच ४९/ए ७४०२ क्रमाकांच्या मोटारसायकलने कंपनीत जात होते. सुभाषनगर चौकाकडून हिंगणा टी-पॉर्इंटकडे जाताना न्यू मेरिडियन कॉन्व्हेंटसमोर क्रेन (जीजे.१४/एम ३६०३)च्या चालकाने वानखेडेंच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. संतुलन बिघडल्याने ते खाली पडले आणि क्रेनच्या चाकात चिरडल्या गेले. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच प्रतापनगर ठाण्याचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकेल रुग्णालयात पाठविला. हंसराजचे भाऊ राज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी क्रेन चालक तारकनाथ शहा (वय ३६, रा. मुर्शिदाबाद) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. वानखेडेंचा बळी घेतल्यानंतर आरोपी शहा घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी नंतर त्याला अटक केली. हंसराजचे वडील गुरुदास वानखेडे हे वेकोलिचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. या अपघातामुळे वानखेडे कुटुंबीयांवर जबर आघात झाला आहे.हेल्मेटही वाचवू शकले नाही जीववानखेडे यांनी दुचाकीवर जाताना ब्रान्डेड कंपनीचे आयएसआय मार्क असलेले हेल्मेट डोक्यात घातलेले होते. मात्र, डोक्यावरूनच चाक गेल्याने हेल्मेटचा चुराडा झाला. हेल्मेटही वानखेडेंचे प्राण वाचवू शकले नाही.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर