जळू दे चिंतेचे वन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:58+5:302021-01-02T04:07:58+5:30
दरवर्षीसारखा ‘एन्जाॅयमेंट’चा मूड टाळत नववर्षाचे स्वागत करणारी तरुणाई यंदा बरीच समजदार झाल्यासारखी वाटत होती. शहरातील बार आणि परमिटरूमला रात्री ...

जळू दे चिंतेचे वन, सुखाचा होऊदे ट्वेन्टी वन !
दरवर्षीसारखा ‘एन्जाॅयमेंट’चा मूड टाळत नववर्षाचे स्वागत करणारी तरुणाई यंदा बरीच समजदार झाल्यासारखी वाटत होती. शहरातील बार आणि परमिटरूमला रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी असल्याने आणि फटाक्यांवर बंदी घातल्याने उत्साही नागरिकांचा हिरमोड झाला. तरीही दिवाळीतील वाचलेले फटाके काही प्रमाणात फुटलेच !
सेलिब्रेशन दुपारपासूनच
नागपुरातील फुटाळा तलाव चौपाटी कायम चैतन्याने आणि तरुणाईने बहरलेली असते. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्सव म्हटल्यावर पुन्हा बहर येणारच ! मात्र यंदा चौपाटीवर शुकशुकाट होता. कसलेही आयोजन नव्हते. पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही मित्रांचे टोळके हजेरी लावून जात होते. येथे सेलिब्रेशन मात्र झाले नाही. मात्र मित्रमैत्रिणींनी एकमेकांना भेटून दुपारपासूनच सेलिब्रेशन केले.
....
सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस
नववर्षाच्या स्वागताचे आणि मावळत्या वर्षाला निरोप देणारे संदेश सकाळपासूनच फिरायला लागले होते. प्रत्यक्ष भेटी टाळत मोबाईलवरून मेसेज पाठवून आणि संपर्क करून शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. यामुळे नेटवर्क जाम झाल्याचा अनुभव अनेकांना आला.