शहर, ग्रामीणमध्ये १००च्या आत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:08+5:302021-06-09T04:10:08+5:30
नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्ण व मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली असताना मात्र, महिन्याभरातच चित्र ...

शहर, ग्रामीणमध्ये १००च्या आत रुग्ण
नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्ण व मृत्यूची धक्कादायक आकडेवारी समोर आली असताना मात्र, महिन्याभरातच चित्र बदलले. सोमवारी शहर व ग्रामीणमध्ये डिसेंबर महिन्यानंतर पहिल्यांदाच १००च्या आत रुग्णांची नोंद झाली. शहरात ५४ रुग्ण व ५ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये ७७ रुग्ण व पुन्हा एकदा शून्य मृत्यूची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन चाचण्यांची संख्या कमी झाली. सोमवारी ६,०१६ चाचण्या झाल्या. यात १३४ रुग्ण व ८ मृत्यूची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ४,७५,९२६ तर मृतांची संख्या ८,९६७ वर पोहोचली आहे. ग्रामीणमध्ये आज केवळ ४९५ चाचण्या झाल्याने पॉझिटिव्हिटीचा दर वाढून १५ टक्क्यांवर गेला, तर शहरात ५,५२१ चाचण्या झाल्याने, हाच दर ०.९७ टक्क्यांवर आला आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, ४३० रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,६३,७२३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.४४ टक्क्यांवर आला आहे.
-३,२३६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण
२९ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यात ७७ हजारांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. मात्र, ३८ दिवसांतच या रुग्णसंख्येत मोठी घट येऊन सोमवारी ३,२३६ वर आली आहे. यातील १,३०६ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये तर १,९३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ६,०१६
शहर : ५४ रुग्ण व ५ मृत्यू
ग्रामीण : ७७ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७५,९२६
ए. सक्रिय रुग्ण : ३,२३६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६३,७२३
ए. मृत्यू : ८,९६७