नागपुरातील लोकवस्तीत बिबट्याचा प्रवेश; पायाचे ठसे आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:47 IST2021-05-28T17:47:39+5:302021-05-28T17:47:58+5:30
Nagpur News नागपूर शहरातील माटे चौक ते अंबाझरी तलाव या साऊथ अंबाझरी मार्गावरील धांडे सभागृहाला लागून असलेल्या रिकाम्या जागेत शुक्रवारी दुपारच्या सुमारास बिबट्या दिसल्याने एकच गडबड उडाली.

नागपुरातील लोकवस्तीत बिबट्याचा प्रवेश; पायाचे ठसे आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शहरातील माटे चौक ते अंबाझरी तलाव या साऊथ अंबाझरी मार्गावरील धांडे सभागृहाला लागून असलेल्या रिकाम्या जागेत शुक्रवारी दुपारच्या सुमारास बिबट्या दिसल्याने एकच गडबड उडाली.
या परिसरात असलेल्या विजय नगर भागातील एका मुलाला हा बिबट दिसला. त्याला पाहताच मुलाने पळ काढला. त्याने ही माहिती इतर नागरिकांना दिल्यानंतर त्यांनी शोध घेणे सुरू केले. मात्र बिबटने तेथून पलायन केले होते. वनविभागाची चमूने या परिसराची पाहणी केली.