शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पारडीच्या भवानीनगरात बिबट्याचा धुमाकूळ, ५ ठिकाणी हल्ले, ७ जखमी, एकजण ‘आयसीयू’त

By दयानंद पाईकराव | Updated: December 10, 2025 13:55 IST

Nagpur leopard Attack News: बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने पारडी परिसरातील भवानीनगर येथील पाच ठिकाणी हल्ले करीत ७ जणांना जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान जखमींपैकी एका व्यक्तीला ‘आयसीयु’त दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर पारडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- दयानंद पाईकराव

नागपूर - बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने पारडी परिसरातील भवानीनगर येथील पाच ठिकाणी हल्ले करीत ७ जणांना जखमी केल्याची घटना घडली. दरम्यान जखमींपैकी एका व्यक्तीला ‘आयसीयु’त दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर पारडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे पारडी परिसरात खळबळ उडाली असून वनमंत्री गणेश नाईक यांनी  घटनास्थळाला भेट दिली. अखेर सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरच्या चमुने बिबट्याला पकडले अन्  पारडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

पारडी परिसरातील भवानीनगरात सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. सुरुवातीला त्याने पाच ठिकाणी हल्ला चढविला. त्यानंतर हा बिबट कुंभकरण निशाद यांच्या घराच्या परिसरात आला. बिबट्याने कुंभकरण यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर हा बिबट वर्मा यांच्या घरी दुसऱ्या माळ्याच्या जिन्यावर लपून बसला होता. परिसरात बिबट्याने हल्ला केल्यामुळे ७ जण जखमी झाल्याची वार्ता पसरताच नागरिकांनी या परिसरात एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वनमंत्री गणेश नाईक, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, नागपूर वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्री लक्ष्मी ए, नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. वीनिता व्यास, अजिंक्य भटकर, उधमसिंग यादव, अविनाश लोंढे घटनास्थळी पोहोचले. वन विभागाच्या ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरने युद्धपातळीवर बिबट्याला रेस्क्यु करण्यासाठी ऑपरेशन सुरु केले. परंतु बिबट हा मोकळ्या जागेत असल्यामुळे त्याला पकडण्याचे मोठे आव्हान ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरच्या चमुसमोर होते. परंतु अत्यंत शिताफीने चमुने सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास बिबट्याला ट्रॅंक्युलाईज करीत रेस्क्यु केले. पकडण्यात आलेला बिबट ३ वर्षांचा असून त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी व निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

अशी आहेत जखमींची नावेपारडीच्या भवानीनगरात हल्ला केल्यामुळे कुंभकरण निशाद (५५) हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ‘आयसीयु’त दाखल करण्यात आले आहे. तर लालेश्वरी शाहु (४०) चंदन शाहु (३७) यांना जनरल वॉर्डात भऱती करण्यात आले आहे. तर रमेश साहित्य (२८), खुशी शाहु (५), कुवसराम ढेकवाड (५७) आणि भारती शाहु (२४) यांना किरकोळ जखमा झाल्यामुळे त्यांच्यावर ओपीडीत उपचार करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Terrorizes Paradi, Nagpur: Seven Injured, One Critical

Web Summary : A leopard attacked seven people in Paradi's Bhawani Nagar, Nagpur, injuring them. One is critical. The leopard was captured after a rescue operation and taken for treatment.
टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर