फुकेश्वर शिवारात बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:05+5:302021-02-14T04:08:05+5:30
उमरेड : बुटीबोरी मार्गावर असलेल्या फुकेश्वर शिवारातील मसेपठार (रिठी) परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट मृतावस्थेत आढळून आला. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील ...

फुकेश्वर शिवारात बिबट्याचा मृत्यू
उमरेड : बुटीबोरी मार्गावर असलेल्या फुकेश्वर शिवारातील मसेपठार (रिठी) परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट मृतावस्थेत आढळून आला. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील ही घटना असून शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास स्थानिक नागरिकांना रस्त्यालगत बिबट मृतावस्थेत आढळला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. वनविभागाला माहिती कळताच उत्तर उमरेडचे वनवरिक्षेत्राधिकारी ए. के. मडावी, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार घटनास्थळी दाखल झाले. उमरेड-बुटीबोरी मार्गावर उमरेड येथून २५ किलोमीटर अंतरावर फुकेश्वर आहे. मसेपठार (रिठी) परिसरात ले-आऊट सुद्धा पाडण्यात आले आहेत. याठिकाणी बाजूलाच नहराचे पाणी सुद्धा आहे. साधारणत: दीड ते दोन वर्षे वयाचे हे बिबट असावे, असा अंदाज वनअधिकाºयांनी व्यक्त केला. त्याचे सर्वच अवयव शाबूत असून बिबटच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा अथवा जखमा नाहीत अशी माहिती वनअधिकाºयांनी दिली. भुकेने व्याकुळ असलेला बिबट पाण्याच्या शोधार्थ आला असावा असा कयास लावला जात आहे. शवविच्छेन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.