विधिमंडळ सचिवालय आजपासून सुरू
By Admin | Updated: November 30, 2015 02:38 IST2015-11-30T02:38:01+5:302015-11-30T02:38:01+5:30
येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यासाठी विधिमंडळ सचिवालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत.

विधिमंडळ सचिवालय आजपासून सुरू
नागपूर : येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यासाठी विधिमंडळ सचिवालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. सोमवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारल्या जाणार असून सचिवालयाच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी मुंबईतील विधिमंडळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागपुरातील विधान भवनाची सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली. तसेच मुंबईहून सचिवालयातील फाईल्ससह एकूणच महत्त्वाचे दस्तऐवजही नागपुरात दाखल झाले आहेत. दस्तऐवजांच्या पेट्या संबंधित विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस होते. त्यामुळे दोन दिवस कार्यालयात कॉम्प्यप्ुटरसह आवश्यक दस्ताऐवज आणि इतर साहित्य लावण्यात आले. विधिमंडळाच्या सुरक्षा अधिकारी (सार्जंट) यांनी विधान भवनातील सुरक्षासुद्धा आपल्या ताब्यात घेतली आहे. विधिमंडळ ग्रंथालय, कक्ष अधिकारी कार्यालयातील पुस्तके व इतर आवश्यक साहित्य लावून झाले आहेत. विधिमंडळ सचिवालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी दाखल झाले आहेत. सोमवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. यंदा लक्षवेधी सूचना स्वीकारण्यासाठी आॅनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यक्तिगत सूचनाही स्वीकारल्या जाणार आहेत.(प्रतिनिधी)