राज्याच्या विकासात विधिमंडळाचे योगदान

By Admin | Updated: August 27, 2014 00:56 IST2014-08-27T00:56:33+5:302014-08-27T00:56:33+5:30

राज्याच्या सर्वांगीण विकासात विधिमंडळाचे बहुमोल योगदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी केले.

Legislature contribution in the development of the state | राज्याच्या विकासात विधिमंडळाचे योगदान

राज्याच्या विकासात विधिमंडळाचे योगदान

अनंत कळसे: अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
नागपूर : राज्याच्या सर्वांगीण विकासात विधिमंडळाचे बहुमोल योगदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी केले.
महाराष्ट्र विधानमंडळ आणि वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था याच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय सेवेतील गट ब अधिकाऱ्यांसाठी आयोजित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद््घाटन कळसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानभवनातील विधान परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका विनीता वेद-सिंघल, विधिमंडळाचे अतिरिक्त सचिव उत्तमसिंह चव्हाण उपस्थित होते.
कायद्याचे राज्य ही संकल्पना खऱ्या अर्थाने विधिमंडळामुळे अस्तित्वात आली, कायदे तयार करणे आणि धोरण तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे हे काम विधिमंडळात होते. अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि समिती पद्धत ही शासकीय धोरणाला दिशा देणारी आहे.
लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून योग्यपणे केली जावी यासाठी विधिमंडळाचे नियंत्रण असते, असे कळसे म्हणाले. संसदीय लोकशाहीत विधिमंडळाचे कायदे आणि कामकाजाची अधिकाऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे, असे मत विनीता सिंघल यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Legislature contribution in the development of the state