शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कळसूत्री बाहुल्यांनी रंगविल्या पौराणिक कथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:49 IST

कळसूत्री अर्थात कठपुतली (पपेट) हा तसा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय. हाताच्या बोटांनी किंवा धाग्याने चालविलेला बाहुल्यांचा खेळ मजेशीर आणि तेवढाच गहनही आहे. असाच अनोखा पपेट शो सोमवारी नागपूरच्या रसिकांनी अनुभवला. राधा-कृष्णाच्या कथेसह इतर पारंपरिक पात्रांच्या आणि भुतांच्याही रोमांचक कथा या कळसूत्रीद्वारे कलावंतांनी रंगविल्या, ज्यातून या पारंपरिक कलेची विलक्षण अनुभूती रसिकांना मिळाली.

ठळक मुद्देरसिकांना पपेट शोची अनोखी मेजवानी : सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कळसूत्री अर्थात कठपुतली (पपेट) हा तसा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय. हाताच्या बोटांनी किंवा धाग्याने चालविलेला बाहुल्यांचा खेळ मजेशीर आणि तेवढाच गहनही आहे. असाच अनोखा पपेट शो सोमवारी नागपूरच्या रसिकांनी अनुभवला. राधा-कृष्णाच्या कथेसह इतर पारंपरिक पात्रांच्या आणि भुतांच्याही रोमांचक कथा या कळसूत्रीद्वारे कलावंतांनी रंगविल्या, ज्यातून या पारंपरिक कलेची विलक्षण अनुभूती रसिकांना मिळाली.युनेस्कोद्वारे घोषित जागतिक कळसूत्री दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात कळसूत्री शोचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालिका अल्का तेलंग, एससीझेडसीसीचे कार्यक्रम अधिकारी दीपक पाटील, शशांक दंडे, श्रीकांत देसाई प्रामुख्याने उपस्थित होते. कळसूत्रीकार मीना नाईक यांच्या प्रयत्नातून हा अनोखा कळसूत्री शो खास नागपूरकरांसाठी आयोजित करण्यात आला.आधुनिक आक्रमणाने या पारंपरिक कळसूत्री खेळाला अवकळा आली असली तरी काही कलावंत आजही ती जिवंत ठेवून आहेत. त्यातील एक नाव म्हणजे पश्चिम बंगालच्या मिदनापूर भागातील पारंपरिक कळसूत्री कलावंत बसंत कुमार घोराई होत. भारतात पुरातन काळापासून वेगवेगळ्या प्रकारचे कळसूत्री खेळ प्रसिद्ध आहेत जे लोकांच्या मनोरंजनाचा भाग होते. त्यातील एक म्हणजे ग्लोव्हज (हातमोजे) कळसूत्री. यामध्ये कळसूत्री (पपेट्स) हाताच्या बोटांमध्ये फसविल्या जातात. या बहुतेक लाकडाच्या, कापडाच्या किंवा पेपर मॅशेचा वापर करून तयार केल्या जातात. या बोटात फसवून कलावंत त्यांचा खेळ दाखवितो. बंगाली किंवा हिंदी गीतांवर विविध पौराणिक कथा मांडत कळसूत्रीद्वारे प्रेक्षकांसमोर सादर केल्या जातात. मिदनापूर हा भाग या कळसूत्री खेळांसाठी आजही प्रसिद्ध आहे. बसंतकुमार घोराई यांनी लोकप्रिय असलेल्या ‘बेनी पुतुल’च्या माध्यमातून राधा-कृष्णाची पारंपरिक कथा गुंफत कळसूत्रीचा खेळ सादर केला. महाराष्ट्रीय महालक्ष्म्याप्रमाणे त्यांच्या बाहुल्या पारंपरिक पद्धतीने दागदागिने घालून सजवलेल्या होत्या आणि घोराई त्या बाहुल्या बोटांच्या सहायाने खेळवत होते. प्रेक्षकांनाही त्यांची कला विस्मयित करून गेली. यादरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, ज्यात घोराई यांनी बेनी पुतुल कळसूत्रींच्या निर्मिती, रचना व सादरीकरणाविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे पपेटद्वारे सादर झालेली गणेश वंदना. गणपतीच्या तीन फुटाच्या पपेट्सच्या खेळातून ही गणेशवंदना कलावंतांनी सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. कळसूत्रीवरील ही सुरुवात खरोखरच प्रेक्षकांसाठी विलक्षण अनुभूती देणारी ठरली. बहुतेकांना भुतांची भीती वाटत असली तरी या कथा ऐकण्याची उत्सुकता प्रत्येकांमध्ये असते. कळसूत्री कलावंत रिंटी सेनगुप्ता यांनी या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातून भुतांच्या कथा सादर करीत उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने उपस्थित बालगोपाल आणि कलारसिकांनी या पारंपरिक कळसूत्री कलेचा आनंद घेतला.

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रcultureसांस्कृतिक