शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

वैधमापनशास्त्र विभाग : आर्थिक वर्षांत ७० लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:31 IST

वैधमापनशास्त्र विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास ७० लाख रुपयांचा दंड (प्रशमन शुल्क) वसूल केला असून, फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ६.६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

ठळक मुद्देफेरपडताळणी व मुद्रांकन शुल्क ६.६१ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैधमापनशास्त्र विभागाने नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये अनेक विक्रेत्यांवर कारवाई करून जवळपास ७० लाख रुपयांचा दंड (प्रशमन शुल्क) वसूल केला असून, फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ६.६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.नागपूर व वर्धा जिल्ह्यात विक्रेत्यांविरुद्ध १०८५ खटलेवैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक हरिदास बोकडे यांनी सांगितले की, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र यंत्रणेला फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात ४ कोटी ९३ लाख ८ हजार ६९३ रुपये महसूल प्राप्त झाला. याशिवाय वजन व मापासंदर्भात एकूण ६८० आणि आवेष्टित वस्तूसंदर्भात एकूण ४०५ खटले नोंदविले. या खटल्यांमध्ये प्रामुख्याने छापील किमतीपेक्षा जास्त आकारणी केलेली एकूण २१ प्रकरणे, हार्डवेअर व इलेक्ट्रिकल आस्थापनेविरुद्ध एकूण ११०, मिठाई व ड्रायफ्रूट विक्रेत्यांविरुद्ध ३६, दारू विक्रेत्यांविरुद्ध ७, गॅस विक्रेत्यांविरुद्ध ४, रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांविरुद्ध ३४ तसेच आठवडी बाजारात भाजीपाला व फळे विक्रेत्यांविरुद्ध एकूण ३६० प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये एकूण ५० लाख ८३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात विक्रेत्यांविरुद्ध ४६१ खटलेबोकडे म्हणाले, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून फेरपडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या स्वरूपात १ कोटी ६७ लाख ७४ हजार ८५६ रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय वजने व मापेसंदर्भात २९६ आणि आवेष्टित वस्तूसंदर्भात १६५ असे एकूण ४६१ खटले नोंदविले. यामध्ये छापील किमतीपेक्षा जास्त आकारणी केलेली एकूण ७ प्रकरणे, हार्डवेअर अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल आस्थापनेविरुद्ध २६, मिठाई व ड्रायफ्रूट विक्रेत्यांविरुद्ध १२, गॅस विक्रेत्यांविरुद्ध ३, रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांविरुद्ध १२ आणि आठवडी बाजारात भाजीपाला व फळ विक्रेत्यांविरुद्ध ७३ अशी १३३ प्रकरणे नोंदविण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये १८ लाख ९५ हजार २५० रुपये प्रशमन शुल्क वसूल करण्यात आले. सर्व कामकाजात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील निरीक्षकांचे योग्य प्रकारे सहकार्य आणि मदत केल्याचे बोकडे यांनी सांगितले.नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कामगिरीफेरपडताळणी व मुद्रांकन शुल्क            ६.६१ कोटीनोंदविलेले खटले                                    १५४६नोंदविलेली प्रकरणे                                ४९३दंड वसुली                                            ७० लाख

 

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर