तायवाडे महाविद्यालयात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:08 IST2021-07-27T04:08:38+5:302021-07-27T04:08:38+5:30

काेराडी : महादुला (ता. कामठी) येथील तायवाडे महाविद्यालयात सोमवारी महाविद्यालय प्रशासन व जेसीआय शक्ती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टाइम ...

Lecture at Taywade College | तायवाडे महाविद्यालयात व्याख्यान

तायवाडे महाविद्यालयात व्याख्यान

काेराडी : महादुला (ता. कामठी) येथील तायवाडे महाविद्यालयात सोमवारी महाविद्यालय प्रशासन व जेसीआय शक्ती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टाइम मॅनेजमेंट’ या विषयावर व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. शरयू तायवाडे हाेत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून जेसीआयच्या रितू डकाहा, मुख्य वक्ते दीप गजबे, डाॅ. राकेश डकाहा व अजय तिवारी उपस्थित होते. प्रा. डाॅ. दिलीप चाफले यांनी प्रास्ताविकातून व्याख्यान आयाेजनाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. डाॅ. शरयू तायवाडे, रितू डकाहा यांनी मार्गदर्शन केले. अजय तिवारी यांनी आभार मानले. आभासी पद्धतीने आयाेजित केलेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली हाेती. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. ढाबरे, प्रा. डॉ. रामटेके व प्रा. डॉ. वकील शेख यांनी सहकार्य केले.

Web Title: Lecture at Taywade College