शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

काम करायचे नसेल तर पद सोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:52 IST

शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक नसतील त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्याजागी दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला संधी दिली जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान : शहर काँग्रेस कार्यकारिणी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक नसतील त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्याजागी दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला संधी दिली जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी देवडिया काँग्रेस भवनात पार पडली. कही पदाधिकारी शहर काँग्रेसच्या बैठकीकडे, पक्षाच्या आंदोलनांकडे सातत्याने पाठ फिरवतात. त्यांच्यावर ठाकरे यांचा रोख होता. ठाकरे म्हणाले, काही लोकांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट मागण्यासाठी देवडियात रांगा लावल्या. आता ते आपल्या प्रभागात फिरतानाही दिसत नाहीत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष कमजोर होत आहे. ब्लॉक अध्यक्षांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. बुथ कमेटी,ब्लॉक कमेटीच्या प्रभागानुसार बैठका घ्याव्या व त्याचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेच्या सभागृहात पाणी समस्येसह इतरही प्रश्न मांडले जातात. मात्र, प्रशासन आमच्या प्रश्नाकडे हेतुपूरस्सर दुर्लक्ष करते, असा आरोप बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी केला. यावर विकास ठाकरे यांनी शहर काँग्रेस नगरसेवकांच्या पाठीशी राहील, असा विश्वास दिला.बैठकीत संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, संदीप सहारे, हरीश ग्वालबंसी, प्रा. दिनेश बानाबाकोडे, सरचिटणीस जयंत लुटे, प्रशांत धवड, रमेश पुणेकर, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, संदेश सिंगलकर, अ‍ॅड. अशोक यावले, राजेश कुंभलकर, नलिनी करागळे, निर्मला बोरकर,पंकज निघोट, रेखा बारहाते,भारती कांबळे, अतिक मलीक, अशोक निखाडे, प्रवीण गवरे, महेश श्रीवास,युवराज लांडे, राजेश पौनीकर,आशुतोष कांबळे, शुभांगी चित्तलवार, प्रवीण आगरे,धरम पाटील,अण्णाजी राऊत, ईश्वर बरडे, हरी नायक, अरविंद वानखेडे,किरण गडकरी,निर्मला बोरकर,प्रकाश बांते, विलास वाघ, अनिल पोरटकर, रवी गाडगे, राकेश पन्नासे, सूरज आवळे, विजया चिटमिटवार, अनिल लारोकर, सुनिता ढोले, हरी यादव आदी उपस्थित होते.तीन बैठकींना अनुपस्थित राहिल्यास पदमुक्तशहर काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. व्यक्तिगत अडचणीमुळे कुणाला बैठकीला येणे शक्य नसेल तर तसे कार्यालयाला कळवावे. मात्र, कुणी सलग तीन बैठकांना अकारण अनुपस्थित राहत असेल तर संबंधित व्यक्तीला पदमुक्त केले जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी बैठकीत दिला.१७ मे रोजी आयुक्तांचा घेराव शहरातील जनतेला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. शहरात चार कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. पथदिव्यांच्या कामाचे टेंडर ७० टक्के जास्त दराने दिले गेले आहे. या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्तांचा १७ मे रोजी काँग्रेसतर्फे घेराव केला जाईल, अशी घोषणा विकास ठाकरे यांनी बैठकीत केली.

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thackreyविकास ठाकरे