नाग नदीलगतच्या झोपडपट्ट्यांना पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:15+5:302021-01-04T04:07:15+5:30

नागपूर : शहरातील नाग नदीलगतच्या झोपडपट्टीधारकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक एड. यशवंत ...

Lease the slums along the Nag River | नाग नदीलगतच्या झोपडपट्ट्यांना पट्टे द्या

नाग नदीलगतच्या झोपडपट्ट्यांना पट्टे द्या

नागपूर : शहरातील नाग नदीलगतच्या झोपडपट्टीधारकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक एड. यशवंत मेश्राम व राजेश देशभ्रतार यांनी केली असून माागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागच्या सरकारने झोपडपट्टीधारकांना ५०० फुटांपर्यंतचे पट्टे मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नासुप्रतर्फे पट्टे वाटपास सुरुवातही झाली. मात्र, नाग नदीलगत दोन्ही बाजूंनी असलेल्या ५० फूटपर्यंतच्या झोपडपट्टीवासीयांना पट्टे वितरित करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाचा निर्णय असल्याने तो सरसकट सर्वांसाठी लागू करावा, अशी माागणी त्यांनी केली आहे.

श्याम हॉटेलचा वारसा जतन करा

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपुरात आले असता ते श्याम हॉटेल येथे थांबले होते. या ठिकाणीच धम्म दीक्षेबाबतच्या महत्त्वपूर्ण घडामाोडी झाल्या. त्यामुळे बाबासाहेबांचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात एक निवेदन सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांना सादर करण्यात आले. यावेळी उपायुक्त सिद्धार्थ गाायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख उपस्थित हाेते. शिष्टमंडळात बहुजन हितायचे हंसराज भांगे, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सचिव शिवदास वासे, सेवानिवृत्त सहसंचालक सिद्धार्थ हस्ते, जागृत नाागरिक मंचचे रामभाऊ आंबुलककर, राजकुमार मेश्राम, डी. एम. बेलेकर, विजय नगरकर, एस.टी. चव्हाण, आदी सहभागी होते.

डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्जीवित करा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्यांच्या रद्द झालेल्या नेमणुका नव्याने करून या समितीला पुनर्जीवित करण्यात यावे, अशी मागणी संविधान परिवारच्या शिष्यमंडळातर्फे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली. प्रकाशन समितीच्या अनुदान निधीत दहा कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, आंबेडकर फाऊंडेशनचे मुख्यालय नागपुरात स्थापित करण्यात यावे, या माागणीचाही यात समावेश होता. शिष्टमंडळात प्रा. राहुल मून, मिलिंद खैरकर, मिलिंद खोब्रागडे, सुधीर भगत, जितू जिभे यांचा समावेश होता.

Web Title: Lease the slums along the Nag River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.