शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लर्निंग डिसॅबिलिटी समुपदेशन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:49 IST

अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंजय अवचट यांची माहितीराज्यात ४६ केंद्रांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता आमिर खानच्या ‘तारे जमी पर’ चित्रपटातील ईशान या मुलाप्रमाणे अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी राज्य शासनाकडून आली आहे. अशा मुलांच्या थांबलेल्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील वैद्यकीय विद्यापीठाचे १६ डीएमआरई आणि जिल्हा रुग्णालयांतर्गत ३० ठिकाणी असे केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.सोशालिस्टिक आॅपरेशन फॉर अकॅडेमिकली हॅण्डीकॅप अ‍ॅण्ड मेन्टोरशीप (सोहम) संस्थेचे अध्यक्ष संजय अवचट यांनी बुधवारी ही माहिती दिली. दिव्यांगाच्या शैक्षणिक अध्ययन अक्षमतेबाबत उपचारासाठी राज्यात केवळ पुणे आणि मुंबई येथे केंद्र आहेत. विदर्भासह मराठवाडा, कोकण विभागात उपचार आणि प्रशिक्षणासाठी सुविधा नसल्याने अशा मुलांच्या पालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. त्यासाठी सोहम या स्वयंसेवी संस्थेने मागील १२ वर्षांपासून लढा चालविला आहे. याबाबत संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. जून २०१६ मध्ये नागपूर खंडपीठानेही संस्थेच्या बाजूने निकाल दिला़ मात्र शासनाकडून कोणतीही पावले उचलली नाही. दरम्यान पावसाळी अधिवेशनात आमदार अनिल बोंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत यासाठी प्रयत्न चालविले. यानंतर ३० जुलै रोजी सचिव स्तराची बैठक घेऊन असे केंद्र स्थापनेबाबत निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत मुंबईचे डॉ. व्ही.एम. काळे व सोहमचे अध्यक्ष अनिल अवचट यांच्या नेतृत्वात सात सदस्यांची समिती गठित करून राज्यभरात सर्वेक्षण सोपविण्यात आले. नागपूरबाबत सात दिवसात अहवाल सादर करून हे केंद्र सुरू करू , असा विश्वास अवचट यांनी दिला.नागपुरात दरवर्षी दीड ते दोन हजार अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना शिक्षण सोडावे लागते. राज्यात हा आकडा ५० हजाराच्या जवळपास आहे. ही मुले सामान्य मुलांसारखीच असतात, मात्र त्यांच्यात लिहण्यावाचण्यात व गणित समजण्यात गतिमंदता असल्याने पालकांना मनस्ताप होतो व मुलांचे नुकसान होते. त्यांच्यासाठी समुपदेशन हाच एक उपाय आहे. योग्य समुपदेशन मिळाले तर काही दिवसात ही अक्षम मुले सामान्य मुलांपेक्षा अधिक बुद्धिमत्तेने काम करू शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत रागीट, मधुमिता क्षीरसागर, विजय खंते, प्रसन्न धनकर यांनीही माहिती दिली.

टॅग्स :Nagpur Government Medical College and Hospitalनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय