वायुसेनानगर प्रभागाची विकासात झेप

By Admin | Updated: September 3, 2014 01:14 IST2014-09-03T01:14:16+5:302014-09-03T01:14:16+5:30

भारतीय वायुसेनेचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या वायुसेनानगर प्रभागातील अंतर्गत वस्त्यांमध्ये बऱ्याच समस्या आहेत. ही स्थिती सुधारावी म्हणून स्थानिक नागरिकांनी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना

Leap in the development of the Vaasenanagar division | वायुसेनानगर प्रभागाची विकासात झेप

वायुसेनानगर प्रभागाची विकासात झेप

लाखोंची विकास कामे मंजूर : रस्ते, समाजभवनासाठी भरीव मदत
नागपूर : भारतीय वायुसेनेचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या वायुसेनानगर प्रभागातील अंतर्गत वस्त्यांमध्ये बऱ्याच समस्या आहेत. ही स्थिती सुधारावी म्हणून स्थानिक नागरिकांनी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना विनंती केली़ मुळक यांनी नागरिकांच्या हाकेला साद देऊऩ समस्या जाणून घेतल्या़ नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करीत विविध विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून घेतला़ या निधीमधून रस्त्यांचे, सिव्हरलाईनचे प्रश्न मार्गी लागले आहेत़
वायुसेनानगर प्रभागातील विहार कॉलनी येथे भेटीदरम्यान नागरिकांनी सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची मागणी राज्यमंत्री मुळक यांच्याकडे केली. या ठिकाणी सिवर लाईन टाकण्यासाठी मुळक यांनी २५ लाख रुपये मंजूर करवून दिले़ यासोबतच प्रभागातील गौरखेड, विश्वासनगर, दीपकनगरसह इतर रस्त्यांच्या कामासाठी ३५ लाख रुपये मंजूर करुन दिले. यापैकी शशिकांत को-आॅप. हाऊसिंग सोसायटी हजारीपहाड व व्हेटरनरी कॉलेज परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत़ विविध भागात समाजभवनाची मागणीही नागरिकांनी केली़ यासाठी सुरेंद्रगड येथे आमदार निधी अंतर्गत समाजभवन बांधकामासाठी १० लाख रुपये तर सेमिनरी हिल्स ख्रिश्चन कॉलनी येथे समाजभवनाच्या बांधकामासाठी १० लाख रुपयांची तरतूदही मुळक यांनी करून दिली.
स्थानिक नागरिकांनी कामे मार्गी लागल्याने आनंद व्यक्त करीत मुळक यांचे आभार मानले. यामध्ये मीनाताई चौधरी, घनश्याम मांगे, स्रेहा वानखेडे, दीपक वानखेडे, दीप्ती काळमेघ, संजय सरायकर, अखिल पठाण, अजय मेश्राम, भरतराम पांडे, प्रकाश वानखेडे, विश्वासराव लाडकर, कवडूजी घुर्वे, श्रीराम चांदेकर, श्यामलाल यादव, महेद्र जांभुळकर, लल्लन ठाकूर, महेंद्र गजभिये, बापू सोमकुवर, मम्मू ठाकूर, मोटू मून, संजय भोसले, नरेंद्र दमाये, खांडेकर, शंकर गुरंग, निंबूलाल वर्मा, रामभाऊ महाजन, संजय कडू, रंगलाल प्रजापती, बाबाराव धोटे, राजू बैरागी, इंद्रबहादूर कुवर, प्रसेनजित सोमकुवर, प्रमोद शेडमाके, रवि गौर, विजय चव्हाण, राहुल मिश्रा, दिनेश लाडे, पंकज उके, उदय मेश्राम, एम. के. ़प्रसन्न कुमार, नारायण खानोरकर, वसंत काकडे, स्पेंसर जॉन, अ‍ॅड़ सी़ एच़ शर्मा, गिरीष अनासाने, कामोने,
शरद दोडके, विक्की चौधरी, रामानंद डोंगरे, प्रमोद पटेल, गोपाल चौबे, युगल विधावत, देवराव तिजारे, अकरम शेख, किशोर माहुरे, अशोक राऊत, नितीन कडवे, ताराचंद सोमकुवर, राहुल द्विवेदी, सोनू शुक्ला, पुष्पेन तिवारी, संतराम कुर्यवंशी, मनोज बिनकर, निशार खान, नाशिर भाई, मनोज गणवीर,सुरेश महांकाळ, बबन गुंजरकर, वैभव सॅम्युअल, संजय घंगारे, राजू वासनिक, अशोक डागोर, छबी कामळे, ज्योती कोरी, मीना ब्राह्मणे, गीता ठाकूर, पुष्पा देवकर, गीता गणवीर, रजनी वासनिक, अनिता वनवे, लीला निखारे, मायासिंग, रंजनी भटकर, प्रीती पाटील, पार्वती गौरखेडे, हिलटॉप बहुउद्देशीय संस्था, संघर्ष युवा फाऊंडेशन आदींचा समावेश आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Leap in the development of the Vaasenanagar division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.