चिंचभुवन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासाठी नेत्यांना सवड मिळेना ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:43+5:302021-02-05T04:59:43+5:30
वसीम कुरेशी नागपूर : वर्धा मार्गावर चिंचभुवन आरओबीचा रेल्वे रुळाच्या वरील आव्हानात्मक भाग तयार झाला आहे. त्यावर मास्टिकचा स्तर ...

चिंचभुवन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासाठी नेत्यांना सवड मिळेना ()
वसीम कुरेशी
नागपूर : वर्धा मार्गावर चिंचभुवन आरओबीचा रेल्वे रुळाच्या वरील आव्हानात्मक भाग तयार झाला आहे. त्यावर मास्टिकचा स्तर चढविण्यात आला आहे. दोन भागात लोड टेस्टही झाली आहे. आधीच एक वर्षापेक्षा अधिक विलंबाने तयार झालेल्या या पुलाच्या कामादरम्यान नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागला
पूल वाहतुकीसाठी का खुला करण्यात येत नाही, याबाबत एनएचएआयकडे विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक कारणे सांगितली. त्यांच्या मते रेल्वे रुळाच्या वरील गर्डरच्या भागात लोड टेस्ट करण्यात आली आहे. आता रॅम्पची लोड टेस्ट शिल्लक आहे. त्यासाठी चार दिवसांचा वेळ लागेल. त्याचे विश्लेषण झाल्यानंतर अहवाल तयार होईल. पुलाच्या खाली काही ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे आहे. सदर उड्डाणपुलाच्या बाबतही असेच सांगण्यात येत होते. वाहतूक सुरू होऊ नये, यासाठी मानकापूर स्टेडियमच्या समोरील भागातही काही दिवसांसाठी मंडप टाकण्यात आला होता.
...............
१५ दिवस वेळ लागू शकतो
‘पुलाचे कॉंक्रिटीकरण मजबूत व्हावे, यासाठी नियमित पाणी टाकण्यात आले. पुलाची एक टेस्ट शिल्लक आहे. सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर हा पूल रहदारीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत खुला होऊ शकतो.’
-राजीव अग्रवाल, प्रादेशिक अधिकारी, एनएचएआय.
तारीख न मिळाल्यामुळे उद्घाटन रखडले
चिंचभुवन आरओबीच्या लोड टेस्टचे कारण जानेवारीच्या सुरुवातीपासून सांगण्यात येत आहे
............