राम कूलरवर एलबीटीची धाड
By Admin | Updated: March 24, 2015 02:23 IST2015-03-24T02:23:31+5:302015-03-24T02:23:31+5:30
ठराविक लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या एलबीटी विभागातर्फे धाडसत्राला अधिक गती देण्यात

राम कूलरवर एलबीटीची धाड
नागपूर : ठराविक लक्ष्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या एलबीटी विभागातर्फे धाडसत्राला अधिक गती देण्यात आली आहे. या अंतर्गत शुक्रवारी महाल येथील मे. राम मार्केटिंग आणि मे. राम कूलरवर विभागातर्फे धाड टाकून कारवाई करण्यात आली. संबंधित प्रतिष्ठान कूलर आणि कपबोर्डचे डीलर आहे. २०१३-१४ या वर्षी डीलरने १.७२ कोटी रुपयाचे साहित्य खरेदी केले. परंतु १.४६ लाख रुपयेच जमा केले. डीलरवर एकूण ६.८८ लाख रुपयाची एलबीटी निश्चित करण्यात आली आहे. डीलरने वार्षिक रिटर्न फाईलसुद्धा केले नाही. एलबीटी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान इन्वॉयस व विक्रीसंबंधीचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले. कारवाईत एलबीटी अधिकारी वेंकट जिचकार, सहायक एलबीटी आॅफिसर संजय दहीकर, जितेंद्र तोमर आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)