शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नागपुरात  अल्पवयीन आरोपीने कापला युवकाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:21 IST

पलंगाखाली लपून बसलेल्या एका अल्पवयीनने आपले बिंग फुटताच युवकावर हल्ला करून त्याचा गळा कापला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवले.

ठळक मुद्देपलंगाखाली होता लपला : बेलतरोडीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पलंगाखाली लपून बसलेल्या एका अल्पवयीनने आपले बिंग फुटताच युवकावर हल्ला करून त्याचा गळा कापला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवले.अल्पवयीन आरोपी हा बेलतरोडी पोलीस ठाणे परिसरात राहतो. तो साडेसतरा वर्षाचा आहे. पोलीस सूत्रानुसार जखमी ३५ वर्षी युवक अल्पवयीन आरोपीच्या वस्तीत पत्नीसोबत राहतो. १२ फेब्रुवारी रोजी युवक ड्युटीवरून घरी आला. तो पत्नीसोबत किराणा सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. तेथून परत आल्यावर जेवण करून रात्री ९.३० वाजता आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेला. बेडरूममध्ये गेल्यावर त्याला बेडखाली काहीतरी असल्याचा संशय आला. त्याने खाली वाकून पाहिले तेव्हा अल्पवयीन आरोपी दिसून आला. त्याला बेडखाली लपून असल्याचे पाहून युवक संतापला. त्याने त्या आरोपीला पकडले. बेडखाली लपण्याचे कारण विचारले तसेच शेजाऱ्यांना आवाज देऊ लागला. त्यामुळे अल्पवयीन संतापला. त्याने धारदार शस्त्राने युवकाच्या गळ्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करून फरार झाला.घटनेच्यावेळी युवकाची पत्नीही बेडरूममध्ये होती. ती काही करण्यापूर्वीच अल्पवयीन फरार झाला. पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती होताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवकाच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपले वय २० वर्षे असल्याचे सांगितले. चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे आढळून आले. या घटनेबाबत कुणीही माहिती द्यायला तयार नव्हता. परिसरात मात्र या प्रकरणाची चर्चा रंगली होती.षड्यंत्राची शक्यताअल्पवयीन आरोपीने ज्या पद्धतीने युवकावर हल्ला केला. त्यावरून तो कुठल्यातरी षड्यंत्रांतर्गत युवकाच्या घरी लपून बसला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याने युवकाच्या गळ्यावर वार केला. परंतु हा वार अधिक गंभीर असता आणि वेळीच उपचार मिळाला नसता तर युवकाला वाचविणे शक्य नसते.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर