उमेदच्या दीप अगरबत्ती उत्पादन समूहाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST2021-02-17T04:13:04+5:302021-02-17T04:13:04+5:30
सावनेर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद ) अंतर्गत सावनेर तालुक्यातील दहेगाव ( रंगारी ) येथील श्री दीप ...

उमेदच्या दीप अगरबत्ती उत्पादन समूहाचा शुभारंभ
सावनेर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद ) अंतर्गत सावनेर तालुक्यातील दहेगाव ( रंगारी ) येथील श्री दीप अगरबत्ती उत्पादक समूहाचा शुभारंभ नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. गट विकास अधिकारी अनिल नागणे, सहायक गट विकास अधिकारी दीपक गरुड, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रोशन लकडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महिला सक्षमीकरणातून गावागावात स्वंय साहाय्यता गट तयार करणे. या बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. उपरोक्त गटाने गट स्थापन करून अगोदर बचतीची सवय लावली. मग शासनाकडून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत मिळाली तथा बँकेकडून २ लाख कर्ज उपलब्ध झाले आणि गट सबळ झाला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दीपक धमगये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग समनवयक कपिल पवार, अमीर पठाण, नरेंद्र सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.