उमरेड येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:11+5:302021-01-17T04:09:11+5:30
यावेळी डॉ. संदीप धरमठोक, डॉ. शिरीष मेश्राम, डॉ. स्वप्निल सहारकर, डॉ. सोनाली वानखेडे, डॉ. स्वप्निल डडमल, डॉ. तृप्ती पंचभाई, ...

उमरेड येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेला प्रारंभ
यावेळी डॉ. संदीप धरमठोक, डॉ. शिरीष मेश्राम, डॉ. स्वप्निल सहारकर, डॉ. सोनाली वानखेडे, डॉ. स्वप्निल डडमल, डॉ. तृप्ती पंचभाई, डॉ. ए. चोपडे, डॉ. सुनित निंबार्ते आदींची उपस्थिती होती. अनिल पारधी, अनिता वानखेडे, रूमाजी कांबळे, मोरेश्वर गजबे, संजय नागपूरे, अशोक समुद्रे, सुधन सोनेकर, अदिती पारधी, सत्यभामा तांबे, वैशाली थेरे, पोर्णिमा तलांडे आदींनी सहकार्य केले.
भिण्याचे कारण नाही
उमरेड येथे पहिली लस घेणाऱ्या दंत चिकीत्सक डॉ. ममता लांजेवार पहिली लस घेण्यास फारच उत्सूक होत्या. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, कोरोनाच्या विपरीत परिस्थितीशी आपण सर्वांनी यथायोग्य मुकाबला केलेला आहे. आता कोरोनाशी दोन हात करायची वेळ आली आहे. अशावेळी भिण्याचे कारण नाही. प्रत्येकाने लसीकरण करण्याची गरज आहे. मला कधी ना कधी लसीकरण करावेच लागले असते. माझी ईच्छा होती की आपण ज्याठिकाणी कर्तव्यावर आहोत, तिथे पहिली लस आपणच घ्यावी. परिचारिका अनिता वानखेडे यांनी तालुक्यातील पहिले लसीकरण डॉ. ममता लांजेवार यांना करताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.