- तर नागपुरात लातूरसारखी स्थिती
By Admin | Updated: April 20, 2016 03:09 IST2016-04-20T03:09:35+5:302016-04-20T03:09:35+5:30
लातूर-मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पाणी असले तरी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येथेही दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.

- तर नागपुरात लातूरसारखी स्थिती
दररोज लाखो लिटर पाणी जाते वाया : अपव्यय थांबविला नाही तर गंभीर दुष्परिणाम
नागपूर : लातूर-मराठवाड्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पाणी असले तरी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय थांबविला नाही तर येथेही दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. कारण पाण्याचा इतर स्रोत नाही आणि उपलब्ध पाणी योग्य प्रमाणात उपयोगात आणणे गरजेचे आहे. अन्यथा अपव्यय झाला तर उपलब्ध पाणी संपण्याची स्थिती गंभीर पाणी संकट निर्माण करू शकते. यात प्रशासनासह प्रत्येक नागरिकाने सहभाग देण्याची आवश्यकता आहे.
मनपाच्यावतीने शहराबाहेरील वस्त्यांमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यादरम्यान दररोज जवळपास एक लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. टँकरमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचे जतन करून अन्य वस्त्यांमध्ये पाणी पोहोचविण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनी केले. मनपातर्फे जवळपास २३० आणि ओसीडब्ल्यूचे ११० अशा एकूण ४४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. ओसीडब्ल्यू टँकर योग्यस्थितीत असल्याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी परवानगी देतच नाही. तर मनपाच्या २३० टँकरपैकी १०० पेक्षा जास्त टँकरवर झाकण नाही, शिवाय लिकेजमुळे त्यातून सतत पाणी वाहत असते. अशा १०० टँकरच्या प्रत्येकी १० अशा एकूण एक हजार फेऱ्या दररोज होतात. प्रत्येक टँकरमधून १०० लिटरपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले आहे. शहरात दररोज एक लाख लिटर पाणी वाया जाते. झाकण नसलेले आणि लिकेज असणारे टँकर तात्काळ बंद करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. नेटवर्क एरिया आणि नॉन मेट्रो एरियात पोहोचविण्यात येणारे पाणी सुभाननगर, डेप्टी सिग्नल, आसीनगर झोन, डम्पिंग यार्ड, म्हाळगीनगर, रेशीमबाग, वंजारीनगर, लक्ष्मीनगर, सेमिनरी हिल्स, वांजरा पाण्याच्या टाकीवरून टँकरमध्ये भरले जाते. या पाण्याच्या टाकीवरून टँकरमध्ये पाणी भरतानासुद्धा येथील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. या चुका टाळल्या तर मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊ शकते. नागपुरात मुबलक पाणी आहे. पण दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर भविष्यात लातूरसारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार आहे.