शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
2
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
3
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
4
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
5
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
6
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
7
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
8
"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
10
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
11
भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!
12
विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?
13
Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!
14
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
15
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
16
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
17
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
18
आजचा अग्रलेख: ड्रॅगन-हत्तीच्या मैत्रीची मजबुरी
19
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
20
तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे ५ नियम; आजपासून गॅस, प्रवास आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदल

रात्री केली चोरी, सकाळी पोहचले जीममध्ये

By admin | Updated: May 8, 2016 03:17 IST

कळमना, पारडी येथील भवानीनगरातील बालाजी मोबाईल शॉपीमधून शुक्रवारी रात्री उशिरा दोन युवकांनी लाखोंचे मोबाईल, हेडफोन, परफ्युम, गॉगल उडवले.

शोरूममधून चोरले लाखोंचे मोबाईल : एका आरोपीला अटकनागपूर : कळमना, पारडी येथील भवानीनगरातील बालाजी मोबाईल शॉपीमधून शुक्रवारी रात्री उशिरा दोन युवकांनी लाखोंचे मोबाईल, हेडफोन, परफ्युम, गॉगल उडवले. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चोरी करणारे युवक तोंडावर कापड बांधून दुकानात शिरले होते. एवढेच नव्हे तर चोरी केल्यानंतर आरोपी सकाळी ६.३० वाजता शोरूम मालकाच्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी देखील गेले. आरोपींमध्ये अभिनिल व त्याचा सहकारी सूरज याचा समावेश आहे. बालाजी मोबाईलचे संचालक प्रवीण मिश्रा यांच्या मोबाईलच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर ‘एक्सरसाइज डॉट कॉम’ नावाची जीम आहे. संबंधित आरोपी दररोज या जीममध्ये व्यायाम करायला यायचे. नेहमीप्रमाणे प्रवीण हे शुक्रवारी रात्री ११ वाजता मोबाईल शॉप बंद करून घरी गेले. यानंतर आरोपींनी रात्री १ वाजता दुकानाच्या मागच्या खिडकीत लागलेले कुलर डक्टींग काढून दुकानात प्रवेश केला. नामवंत कंपन्यांचे ४० ते ५० मोबाईल व अन्य सामान घेऊन पसार झाले. चोरी केल्यानंतर आरोपी सकाळी ६.३० वाजता जीममध्येही गेले. तेथे प्रशिक्षक अभिषेक यांना खालच्या शोरूममधील कुलर पाहून संशय आला. त्यांनी आरोपी युवकालाच दुकानात काय झाले ते पहायला पाठविले. अभिनिलने परत येऊन दुकानाच्या आतील सामान अस्ताव्यस्त पडून असल्याचे सांगत चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. हे ऐकताच प्रशिक्षक अभिषेक यांनी तत्काळ जीम व मोबाईल शॉपीचे मालक प्रवीण यांना माहिती दिली. प्रवीण यांनी दुकानात पोहचून चोरी गेलेल्या सामानाचा अंदाज घेतला व कळमना पोलिसांना कळविले. (प्रतिनिधी) कपडे लपविताना दिसले आरोपीदुकानातील चोरीबाबत पोलीस चौकशी करीत असतानाच दुकान मालकाला त्यांच मित्र रोशन गेडाम याचा फोन आला. रोशनने सांगितले की, भरतवाडा ते कामठी रोड दरम्यान आरोपी युवक त्यांच्या दुकानातील कपडे व सामान घेऊन जाताना दिसले. रोशन यांनी लगेच आपल्या काही सहकाऱ्यांसह आरोपींचा पाठलाग केला. आरोपी नाल्याजवळ कपडे, मोबाईल व अन्य सामान खड्ड्यात लपवित होते. रोशन व सहकाऱ्यांनी त्यांना घेरले. या वेळी अभिनिल पळण्यात यशस्वी झाला तर सूरज सापडला. माहिती मिळताच प्रवीणही जीमच्या अन्य लोकांसोबत घटनास्थळी पोहचला. सुरजजवळ ३५ मोबाईल सापडले. अन्य सामान घेऊन अभिनिल फरार झाला आहे.