साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:54 IST2017-10-15T00:54:16+5:302017-10-15T00:54:29+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक सेनानी आणि दीक्षाभूमीवर पार पडलेल्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात महत्त्वाचे योगदान देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ....

साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक सेनानी आणि दीक्षाभूमीवर पार पडलेल्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात महत्त्वाचे योगदान देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चरणदास जगन्नाथ सोमकुंवर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साशृ नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. १४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय बौद्धजन परिषदेचे सदस्य आणि आंबेडकरी चळवळीच्या पहिल्या फळीतील ते कार्यकर्ते होते. चरणदास सोमकुंवर यांनी धम्मदीक्षा सोहळ्यानंतर रेल्वेतील नोकरी सोडलीे. त्यांचे मोठे योगदान धम्मदीक्षा सोहळ्यासाठी होते. श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांच्या सुरक्षेत ते तैनात होते. ६१ व्या धम्मदीक्षा वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पाच मुलांमध्ये रत्नकश्यप, आनंद, सुधीर, सुनील सोमकुंवर आणि बहीण रेखा काबंळे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी समाजात पोकळी निर्माण झाली असल्याची शोकसंवेदना मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, विचारवंतांसह उद्योजक व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.