शेवटच्या भेटीत मित्राजवळ रडला ?

By Admin | Updated: August 13, 2016 02:12 IST2016-08-13T02:12:23+5:302016-08-13T02:12:23+5:30

नेहमीप्रमाणे आज सकाळी अभिषेकने दिनेशला सकाळचा चहा, नाश्ता आणून दिला. त्यावेळी दिनेश खिन्न होता.

In the last meeting, a friend cried? | शेवटच्या भेटीत मित्राजवळ रडला ?

शेवटच्या भेटीत मित्राजवळ रडला ?

फरार डब्बा व्यापाऱ्याची आत्महत्या
नागपूर : नेहमीप्रमाणे आज सकाळी अभिषेकने दिनेशला सकाळचा चहा, नाश्ता आणून दिला. त्यावेळी दिनेश खिन्न होता. त्याला दिलासा देत अभिषेक निघून गेला. त्यानंतर एका मित्रासह दुपारी १.३० ते २ च्या सुमारास जेवणाचा डबा घेऊन आला. नेहमीप्रमाणे त्याने दार ठोठावले. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राने बाजूच्या खिडकीच्या फटीतून डोकावून बघितले असता दिनेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे त्यांनी घरच्यांना कळविले. नंतर पोलिसांना सांगण्यात आले.
फरार डब्बा व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची वार्ता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. हुडकेश्वर ठाण्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. दरम्यान, डब्बा व्यापाऱ्याच्या आत्महत्येची वार्ता उघड होऊन नये म्हणून पोलिसांनी रात्रीपर्यंत खबरदारी घेतली होती. कर्जदारांचा तगादा वाढला असतानाच पोलिसांच्या कारवाईचाही धाक असल्याने दिनेश गोकलानी या डब्बा व्यापाऱ्याची मानसिक स्थिती बिघडली होती. तो अलीकडे आपली व्यथा मित्रांना बोलूनही दाखवत होता. मित्र आणि नातेवाईक त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होते. कोर्टातून जामीन मिळेल, अशीही आशा दाखवत होते.(प्रतिनिधी)

 

Web Title: In the last meeting, a friend cried?