चिमुकल्यासोबतचा प्रवास ठरला अखेरचा
By Admin | Updated: May 6, 2017 02:30 IST2017-05-06T02:30:19+5:302017-05-06T02:30:19+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान मृत झालेल्या बाळावर आज शुक्रवारी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिमुकल्यासोबतचा प्रवास ठरला अखेरचा
मातेचा टाहो : रेल्वे प्रवासातच झाला मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान मृत झालेल्या बाळावर आज शुक्रवारी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या बाळाच्या मातेने एकच टाहो फोडल्यामुळे तेथे उपस्थित अनेकांच्या डोळ््यात पाणी आले.
हुपरी, बिहार येथील रहिवासी सोनू पिंटू गुप्ता (२५) या आपल्या तीन मुलांसह हुपरीला जात होत्या. सिकंदराबाद-दानापूर एक्स्प्रेसच्या महिला कोचमधून प्रवास करीत असताना त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळाची प्रकृती बिघडली. दरम्यान, बल्लारशाह रेल्वेस्थानकावरच त्याचा श्वास थांबला. बाळ काहीच हालचाल करीत नसल्याचे पाहून सोनूने एकच टाहो फोडला. त्या मातेची वेदना पाहून इतर प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली. नागपुरात गाडी येताच बाळाला छातीशी कवटाळून असलेली सोनू खाली उतरली. महिला पोलिसांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने बाळाला छातीशी कवटाळून घेतले होते. ती बाळाला सोडण्यास तयार नव्हती. अखेर महिला पोलिसांनी त्या मातेची समजूत काढल्यानंतर तिने बाळाला सोडले. त्यानंतर बाळाचे पार्थिव मेयो रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आले. आज गुरुवारी सोनूचे पती नागपुरात आले. बाळाचे शवविच्छेदन होऊन दुुपारी पार्थिवही मिळाले. त्यानंतर महिला पोलिस जयश्री बुरडे, पोलीस शिपाई भावे आणि हेड कॉन्स्टेबल शेख बाबर यांच्या उपस्थितीत मोक्षधाम घाटावर पार्थिव दफन करण्यात आले. यावेळी या मातेने एकच टाहो फोडल्यामुळे पोलिसांच्या डोळ््यातही पाणी आले.