शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूर खाणीतील जैवविविधतेसाठी वेकोलिला शेवटची संधी! न्यायालयाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:33 IST

हायकोर्ट : मागील आदेशाचे उल्लंघन झाल्याने फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर कोळसा खाण क्षेत्रामध्ये जैवविविधता पुनर्स्थापित करण्याकरिता गेल्या २० वर्षांमध्ये केलेल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयात माहिती सादर करण्यासाठी वेकोलिला शेवटची संधी म्हणून ९ जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भातील मागील आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे वेकोलिला कडक शब्दांत फटकारण्यात आले.

पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या प्रकृती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी दुर्गापूर कोळसा खाणीच्या विस्ताराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या २८ एप्रिल रोजी न्यायालयाने वेकोलिला संबंधित माहिती २५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, प्रतिज्ञापत्रातील माहिती असमाधानकारक आढळून आल्यास वेकोलिविरुद्ध आवश्यक आदेश जारी केला जाईल, अशी तंबी दिली होती. असे असताना वेकोलिला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयश आले. हे प्रकरण २६ जून रोजी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता, याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. महेश धात्रक यांनी वेकोलिच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले. त्यामुळे न्यायालयाने वेकोलिवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, वेकोलिने कळकळीची विनंती केल्यामुळे त्यांना संबंधित माहिती देण्याकरिता शेवटची संधी म्हणून ९ जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली.

ही वेकोलिची जबाबदारी आहेदुर्गापूर कोळसा खाणीकरिता १ हजार ३६४.६४ हेक्टरचा पट्टा वाटप झाला असून त्यापैकी बहुतेक क्षेत्रातील कोळसा काढण्यात आला आहे. संबंधित क्षेत्र वेकोलिकरिता निरुपयोगी झाले आहे. त्या क्षेत्रामध्ये जैवविविधता पुनर्स्थापित करणे वेकोलिची जबाबदारी आहे.

टॅग्स :nagpurनागपूर