अखेर ‘ते’ काढ्याचे बॅनर हटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:36+5:302021-05-23T04:07:36+5:30
नागपूर : नॉर्थ अंबाझरी रोड मार्गे रामदासपेठकडे जाणाऱ्या सिमेंट रोडलगतच्या शिवदानमल मोखा मार्गावर लावण्यात आलेले काढ्याची जाहिरात करणारे बॅनर ...

अखेर ‘ते’ काढ्याचे बॅनर हटले
नागपूर : नॉर्थ अंबाझरी रोड मार्गे रामदासपेठकडे जाणाऱ्या सिमेंट रोडलगतच्या शिवदानमल मोखा मार्गावर लावण्यात आलेले काढ्याची जाहिरात करणारे बॅनर अखेर शनिवारी हटविण्यात आले.
‘लोकमत’मध्ये या विषयावर शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित झाले होते. त्याची दखल घेऊन संबंधित खासगी रुग्णालयानेच पुढाकार घेऊन सकाळी तातडीने हे बॅनर हटविले. या वृत्ताची दखल महानगर प्रशासनानेही घेतली होती.
उल्लेखनीय म्हणजे, काही वर्षांपूर्वी या मार्गाचे शिवदानमल मोखा मार्ग असे नामकरण करून मनपा प्रशासनाने या ठिकाणी शिवदानमल मोखा यांच्या नावाने सुंदर संकेतस्थळ बनविले आहे. मात्र नेमके त्यावरच संबंधित रुग्णालयाने काढ्याची जाहिरात करणारे बॅनर लावले होते. यामुळे हा मार्ग कोणता, हे शहरात येणाऱ्या आगंतुकांना ओळखणे अडचणीचे झाले होते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात असे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.