शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील नारीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:57 IST

जरीपटका परिसरातील नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून चारचाकी वाहनासह अवैध दारूसाठा जप्त केला.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका परिसरातील नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे उत्पादन शुल्क विभागानेधाड टाकून चारचाकी वाहनासह अवैध दारूसाठा जप्त केला. या प्रकरणात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नारी भागात अवैध पध्दतीने दारू तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे धाड टाकली असता महिन्द्रा स्कॉर्पिओ (एम.एच.३१ बीबी ६५८६) यामध्ये मध्यप्रदेश राज्य निर्मित व तेथे विक्रीकरिता असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला उच्च प्रतीच्या ब्रॅन्डचे ७५० मिलीच्या रेड लेबल, ब्लेंडर प्राईड, रॉयल चॅलेंज व्हिस्की तसेच स्मिरअप वोडका, अ‍ॅब्सुलेट वोडका या ब्रॅन्डच्या ७२ सिलबंद बाटल्या आदी जप्त करण्यात आल्या.याप्रकरणी मुख्य आरोपी साहिल बालचंद तूरकर, राजकुमार लक्ष्मीप्रसाद रहांगडाले व इतर आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम ६५ (ए),(ई),८१,८३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई , राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष खरे, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, जवान प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, विनोद डुंबरे व महिला जवान धनश्री डोंगरे यांनी केली. याप्रकरणी निरीक्षक सुभाष खरे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागraidधाड