दोन महिन्यांनंतर कोरोनाच्या रुग्णांत मोठी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:22+5:302021-01-17T04:09:22+5:30
नागपूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत दोन महिन्यांनंतर मोठी घसरण झाली. शनिवारी ...

दोन महिन्यांनंतर कोरोनाच्या रुग्णांत मोठी घसरण
नागपूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत दोन महिन्यांनंतर मोठी घसरण झाली. शनिवारी २७४ नवे बाधित तर ६ रुग्णांचे मृत्यू नोंदविले गेले. रुग्णांची एकूण संख्या १,३०,१४० झाली असून मृतांची संख्या ४,०६४ वर पोहोचली. विशेष म्हणजे, रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक ४४७ रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून ३५० ते ४५० दरम्यान दैनंदिन रुग्णांची संख्या दिसून येत होती. परंतु चाचण्यांच्या तुलनेत आज सर्वात कमी ६.७६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. ४०४८ चाचण्यांमध्ये ३५९८ आरटीपीसीआर तर ४५० रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. अँटिजेनमधून ४१ तर आरटीपीसीआरमधून २३३ रुग्णांना कोविड असल्याचे निष्पन्न झाले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २३२, ग्रामीणमधील ३९ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये शहरातील १, ग्रामीणमधील २ तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू होते. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १,२१,८०९ झाली असून याचे प्रमाण ९३.६० टक्क्यांवर गेले आहे. सध्या ४२६७ रुग्ण उपचाराखाली आहेत. यात ११६० रुग्ण रुग्णालयात तर ३१०७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-दैनिक संशयित : ४०४८
-बाधित रुग्ण : १३०१४०
_-बरे झालेले : १२१८०९
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४२६७
- मृत्यू : ४०६४