घरमालक लग्नात, चोरटे घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST2020-11-22T09:29:45+5:302020-11-22T09:29:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरमालक भाचीच्या लग्नात गुंतले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून रोकड आणि सोन्याचे दागिने ...

The landlord at the wedding, the thief at home | घरमालक लग्नात, चोरटे घरात

घरमालक लग्नात, चोरटे घरात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरमालक भाचीच्या लग्नात गुंतले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर लग्नमंडळीत एकच खळबळ उडाली.

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातिम अपार्टमेंट आहे. येथे पाचव्या माळ्यावर सलीम अहमद हाजी अब्दुल कदिर (वय ३८) राहतात. शुक्रवारी त्यांच्या भाचीचा विवाह सोहळा होता. त्यासाठी सर्व पाहुणे मंडळी जमली होती. रात्री ९ च्या सुमारास दाराला कुलूप लावून सलीम आणि त्यांचे नातेवाईक इमारतीच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात लग्नसमारंभात गुंतले. ही संधी साधून चोरटे त्यांच्या घरात शिरले. त्यांनी सलीम यांच्या सदनिकेतील कपाटात ठेवलेली ९५ हजारांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला. लग्न समारंभातील सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर सलीम नातेवाईकांसह सदिनकेच्या दारावर पोहचले. दाराचे कुलूप तुटून दिसल्याने त्यांना शंका आली. घरात बघितले असता आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी रोकड आणि दागिने लंपास केल्याचे उघड झाले. त्यांनी शांतीनगर पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: The landlord at the wedding, the thief at home