बनावट कागदपत्रे बनवून ६ कोटींची जमीन हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:06+5:302021-03-04T04:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बनावट कागदपत्रे तयार करून नातेवाइकांनीच एका वृद्धाची सहा कोटी रुपयांची जमीन परस्पर विकून टाकली. ...

Land worth Rs 6 crore was seized by making fake documents | बनावट कागदपत्रे बनवून ६ कोटींची जमीन हडपली

बनावट कागदपत्रे बनवून ६ कोटींची जमीन हडपली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बनावट कागदपत्रे तयार करून नातेवाइकांनीच एका वृद्धाची सहा कोटी रुपयांची जमीन परस्पर विकून टाकली. ही बनवाबनवी उघड झाल्याने प्रतापनगर पोलिसांनी एका महिला बिल्डरसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

चंदू ऊर्फ चिंधू कवडूजी मेश्राम (वय ७९, रा. गोपालनगर) असे तक्रारदार वृद्धाचे नाव असून आरोपींची नावे मिनल नरहरी कावळे (वय ४८, रा. गुडधे लेआऊट), बाबूराव दमडू मेश्राम (वय ७०, रा. शिवलाईट अपार्टमेंट स्वावलंबीनगर) आणि रवींद्र पांडुरंग मेश्राम (वय ५७, रा. विश्रामनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

चंदू मेश्राम यांच्या तक्रारीनुसार, त्यांची माैजा भामटी येथे वडिलोपार्जित जमीन असून त्यावर त्यांचा तसेच अन्य नातेवाइकांचा हक्क आहे. त्यांना डावलून आरोपींनी बनावट कागदपत्रे तसेच बनावट मृत्युपत्राचा लेख तयार करून मालकी हक्कावर आपली नावे चढवली. नंतर या जमिनीवर बाबूराव, रवींद्र मेश्राम आणि मिनल कावळे यांनी ११ माळ्यांची इमारत उभारली. त्यात ३३ सदनिका बांधून त्याची परस्पर विक्रीही केली. अशा प्रकारे आपल्याला ६ कोटींचा फटका दिला, असे चिंधूजी यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी करून प्रतापनगर पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात आरोपी कावळे आणि बाबूराव तसेच रवींद्र मेश्राम या तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Land worth Rs 6 crore was seized by making fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.