शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गुंतवणूकदारांच्या रकमेतून खरेदी केली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:03 IST

कोट्यवधी रुपयाचा अपहार करणाऱ्या आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह

ठळक मुद्देआनंद साईच्या संचालकांना २० पर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधी रुपयाचा अपहार करणाऱ्या हुडकेश्वर येथील आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने गुंतवणूकदारांच्या रकमेतून जमीन खरेदी केली होती. चुकीच्या पद्धतीने ही खरेदी करून सोसायटीला चुना लावला आहे. यादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या संचालकांना सोमवारी न्यायालयासमोर सादर करून, २० ऑगस्टपर्यंत त्यांची पोलीस कोठडी घेतली आहे.आर्थिक शाखेने सोसायटीतर्फे पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आणले आहे. पोलिसांनी रविवारी सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद नारायण घोगरे, सचिव संजय मनोहर भगत, मॅनेजर ज्ञानेश्वर पांडुरंग उमरेडकर आणि अकाऊंटंट धीरज चरणदास नगरकर यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र गुंतवणूक हित संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.सोसायटीमध्ये ५,८०० गुंतवणूकदार आणि सदस्य आहेत. २०१४ ते २०१७ दरम्यान आरोपींनी बोगस पद्धतीने अनेक लोकांना कर्ज दिले. त्यांनी बाहेरच्या व्यक्तींनाही कर्ज वाटले. बोगस दस्तावेज बनवून काही कर्जदारांनी कर्ज परत केल्याचे दर्शविले. गुंतवणुकीचा अवधी पूर्ण न होऊनही पैसे परत न केल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. त्यांनी आरोपींची भेट घेतली. तेव्हा आरोपी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. त्यामुळे संशय आणखी बळावला.गुंतवणूकदारांनी या प्रकरणाची तक्रार केली. या आधारावर पतसंस्थेच्या जिल्हा विशेष लेखा परीक्षक अनिल पाटील यांनी सोसायटीच्या व्यवहाराची तपासणी केली. यात पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. या आधारावर ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मिलिंद घोगरेच्या पत्नीलाही आरोपी बनविले आहे. पोलीस अटक केलेल्या आरोपींची विचारपूस करीत आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचाही पत्ता लावला जात आहे. सोसायटीचे मुख्य कार्यालय शारदा चौकात आहे. अमरनगर याशिवाय नरखेड आणि कोंढाळीतही शाखा आहे. सोसायटीतील बहुतांश सदस्य मध्यमवर्गीय आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूकArrestअटक