महिलेच्या पर्समधून दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:18+5:302021-02-05T04:43:18+5:30
उमरेड : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून राेख रक्कम व मंगळसूत्र असा एकूण ६० हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल चाेरून ...

महिलेच्या पर्समधून दागिने लंपास
उमरेड : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून राेख रक्कम व मंगळसूत्र असा एकूण ६० हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना मांढळ ते उदासा येथे प्रवासादरम्यान घडली. निर्मला राजेश्वर गेडाम (४०, रा. उदासा, ता. उमरेड) या उदासा येथे येण्याकरिता मांढळ येथून एसटी बसमधून उमरेड येथे आली. त्यानंतर ती उमरेड येथून आपल्या माेपेडने उदासा येथे पाेहाेचली. दरम्यान, तिच्याकडील पर्स चेनजवळ फाटलेले दिसून आल्याने त्यांनी पाहिले असता पर्समधील चार ताेळ्याचे मंगळसूत्र किंमत ६० हजार रुपये व राेख ७०० रुपये असा एकूण ६० हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात आराेपीने चाेरून नेला. याबाबत गेडाम यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार जयसिंगपुरे करीत आहेत.