६२ हजाराचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST2021-03-23T04:09:41+5:302021-03-23T04:09:41+5:30

बुटीबाेरी : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत ६२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना बुटीबाेरी शहरातील प्रसाद ...

Lampas worth Rs 62,000 | ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास

६२ हजाराचा मुद्देमाल लंपास

बुटीबाेरी : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत ६२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना बुटीबाेरी शहरातील प्रसाद काॅलनी येथे रविवारी (दि.२१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याेगेश माराेतराव हुके (४१, रा. प्रभाग क्र. ६, प्रसाद काॅलनी, बुटीबाेरी) हे आपल्या कुटुंबीयांसह शनिवारी त्यांच्या मूळगावी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराच्या मागील दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने बेडरूममधील आलमारीमध्ये ठेवलेले ६२,५०० रुपये किमतीचे विविध साहित्य चाेरून नेले, शिवाय आलमारीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. रविवारी सकाळच्या सुमारास हुके घरी आले असता, ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरखडे करीत आहेत.

Web Title: Lampas worth Rs 62,000