दागिन्यांसह ३३ हजाराचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:01+5:302021-02-06T04:13:01+5:30
सावनेर : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेने-चांदीच्या दागिन्यांसह ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही ...

दागिन्यांसह ३३ हजाराचा मुद्देमाल लंपास
सावनेर : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेने-चांदीच्या दागिन्यांसह ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना सावनेर शहरातील मुरलीधर मंदिर परिसरात बुधवारी (दि. ३) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अफराेजहाँ अताऊर रहमान फारुख (३९, रा. मुरलीधर मंदिर, माेठी मशिदीजवळ, सावनेर) या साेमवारी (दि.१) काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या हाेत्या. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील लाेखंडी कपाटात ठेवलेले साेन्या-चांदीचे दागिने किंमत १८ हजार रुपये, राेख १,५०० आणि इतर घरगुती वस्तू असा एकूण ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. दरम्यान, बुधवारी सकाळच्या सुमारास अफराेजहाँ अताऊर रहमान फारुख या घरी आल्या असता, घरात चाेरी झाल्याचे आढळून आल्याने त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. घटनेचा पुढील तपास पाेलीस हवालदार बाेरकर करीत आहेत.