२.४२ लाखाचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:42+5:302021-01-02T04:08:42+5:30

सावनेर : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण २ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा ...

Lampas worth Rs 2.42 lakh | २.४२ लाखाचा मुद्देमाल लंपास

२.४२ लाखाचा मुद्देमाल लंपास

सावनेर : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण २ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना सावनेर शहरातील गुजरखेडी भागात घडली.

राहुल जगदीश नायक (२७, रा. गुजरखेडी, सावनेर) हे कुटुंबीयांसह डाेंगरगड (छत्तीसगड) येथे देवीच्या दर्शनासाठी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप व कडी ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटातील १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि ६० हजार रुपये राेख असा एकूण २ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केला. घरी परतल्यावर चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक सतीश पाटील करीत आहेत.

Web Title: Lampas worth Rs 2.42 lakh